मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्याच्या एन्ट्री पॉईंट चेकपोस्टवर वाहनचालकांच्या RTPCR ची सक्ती रद्द, फक्त तापमान आणि लक्षणं तपासणार

राज्याच्या एन्ट्री पॉईंट चेकपोस्टवर वाहनचालकांच्या RTPCR ची सक्ती रद्द, फक्त तापमान आणि लक्षणं तपासणार

Impact News18 lokmat ने देखिल याबाबतच्या अडचणी समोर आणल्या होत्या. त्यानंतर अखेर चेकपोस्टवर RTPCR चाचणी करण्याचा हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.

मुंबई, 15 मे :  कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या (Maharashtra Government) हद्दीत प्रवेश करणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांसाठी RTPCR टेस्ट बंधनकारक केली होती. या निर्णयामुळं राज्यातील सर्व आरटीओ चेक पोस्टवर (RTO checkpost) अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर News18 Lokmat ने देखिल याबाबतच्या अडचणी समोर आणल्या होत्या. त्यानंतर अखेर चेकपोस्टवर RTPCR चाचणी करण्याचा हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.

(वाचा-Corona चे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कोरोनाचा अनुभव, अॅम्ब्युलन्स-रुग्णालयाची सफर)

राज्याच्या हद्दीत प्रवेश करताना सर्वच मालवाहतूक वाहनांसाठी RTPCR चाचणी बंधनकारक केल्यानं सर्व चेक पोस्टवर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सीमा भागातील बहुतांश चेकपोस्टवर हेच चित्र पाहायला मिळत होतं. महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर चारोटी चेक पोस्टवर यामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळंच राज्य सरकारनं चेकपोस्टवरच कोरोनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मालवाहतूक दार संघटनांनी केली होती.

(वाचा-Mucormycosis राज्यात ब्लॅक फंगसचे 52 मृत्यू, एक लाख इंजेक्शनसाठी काढणार टेंडर)

प्रत्यक्षात ट्रक चालकांना ट्रक सोडून चाचणी केंद्रावर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं माल वाहतूकदार संघटनेनं चाचणीची ही अटच रद्द करण्याची मागणी केली होती.  News18 Lokmat ने देखील याबाबतच्या अडचणी समोर आणल्या होत्या. त्यानुसार निर्णय घेण्यात आला असून, आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचा नवा आदेश काढण्यात आला आहे.

या निर्णयानंतर चेकपोस्टवरून आता वाहनचालकांना केवळ फक्त तापमान आणि लक्षणं तपासून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. चाचणीसाठी थांबवून धरलेली वाहनंही लगेचच सोडण्यात आली. अखिल भारतीय माल वाहतूकदार संघटनेच्या वतीनं कुलतरण सिंग अटवाल, बाबा शिंदे यांनी यासाठी सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी व्हावा आणि संसर्ग होण्यासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या चालकांचा हातभार लागू नये म्हणून राज्याच्या सीमेवर चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यामुळं झालेल्या अडचणींनंतर तो लगेचच मागे घेण्यात आला.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra News, Traffic