अपघातातील जखमींना 30 हजार रुपयांची मदत, राज्य सरकारची योजना

अपघातातील जखमींना 30 हजार रुपयांची मदत, राज्य सरकारची योजना

राज्यात रस्ते अपघात झाल्यास जखमींना पहिल्या ४८ तासांत होणाऱ्या खर्चांपैकी ३० हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील

  • Share this:

15 मे : महाराष्ट्रात विविध रस्त्यांवर दररोज अपघात होतात. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमींना जीव गमवावा लागतो वा अपंगत्व येते. अशा जखमींना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च देण्याची योजना राज्याच्या आरोग्य विभागाने आखली आहे.

राज्यात रस्ते अपघात झाल्यास जखमींना पहिल्या ४८ तासांत होणाऱ्या खर्चांपैकी ३० हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील. येत्या अपघातग्रस्तांना ३० हजारांची मदत तीन महिन्यांत ही योजना लागू होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने या योजनेचा प्रस्ताव तयार केला असून तो वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

या योजनेची निविदा निघाल्यानंतर येत्या दोन ते तीन महिन्यांत ती लागू करण्यात येईल, असे आरोग्य विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय.

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विमा कवच' असं या योजनेला नाव देण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर ३ दिवसांपर्यंत उपचार मिळतील. योजनेसाठी वयाची अट, रहिवासी प्रमाणपत्र आदींची गरज नसेल. महाराष्ट्रात अपघातात जखमी परराज्यांतील व्यक्तींनाही लाभ मिळेल.

कर्नाटकमध्ये जखमींच्या उपचारासाठी अशा स्वरूपाची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत जखमींना ४८ तास रुग्णालयात राहावे लागल्यास राज्य सरकारकडून उपचारासाठी २५ हजार रुपये खर्च करण्यात येतो. त्याच धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

First published: May 15, 2017, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading