सत्तेपासून दूर राहिलेले RSS चे भगतसिंग कोश्यारी आता बनले आहेत सत्तेचे केंद्रबिंदू

सत्तेपासून दूर राहिलेले RSS चे भगतसिंग कोश्यारी आता बनले आहेत सत्तेचे केंद्रबिंदू

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी पाहिल्या तर सगळ्यांचंच लक्ष राजभवनाकडे लागलेलं आहे. जाणून घेऊया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल.

  • Share this:

सुमीत पांडे

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून पेच निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी पाहिल्या तर सगळ्यांचंच लक्ष राजभवनाकडे लागलेलं आहे. सत्तास्थापनेचा हा पेच सुटत नाहीये आणि त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. या कारणांमुळेच भगतसिंग कोश्यारी हे नेमके कोण आहेत याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

2007चं सत्तानाट्य

उत्तराखंडचे भगतसिंग कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आहेत. त्यांच्याच राज्यात जेव्हा 2007 मध्ये मुख्यमंत्री निवडण्यासाठी बैठक होत होती तेव्हा भगतसिंग कोश्यारी संधीची वाट पाहात होते. 70 आमदार असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपला 34 जागा मिळाल्या होत्या. काही अपक्षांनीही पाठिंबा देऊ केला होता. त्यावेळचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी एक पथक उत्तराखंडला पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपचं केंद्रीय नेतृत्व लालकृष्ण अडवाणींकडे होतं. सत्तास्थापनेसाठी सगळ्या आमदारांना त्यांची मतं मांडण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडी घडत असताना भगतसिंग कोश्य़ारी मात्र शांत होते.

बंड केलं नाही

भाजपचे तीन चतुर्थांश आमदार कोश्यारी यांच्या बाजूने होते. त्याचबरोबर वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले बी. सी. खंडुरी यांचाही कोश्यारी यांना पाठिंबा होता. काही कमी जणांनी रमेश पोखरियाल निशंक यांना पाठिंबा दिला. पण अखेर भाजपने बी. सी. खंडुरी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं.कोश्यारी खंडुरींसोबत राजभवनात गेले आणि त्यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. त्यांनी सत्तेच्या राजकारणात न पडता पक्षाचा आदेश मानणं पसंत केलं. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्यामुळे त्यांनी पक्षाची शिस्त पाळली.त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर त्यांनी बंड केलं असतं, असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात.

राज्याबाहेरच काम

जेव्हा उत्तराखंडची निर्मिती झाली त्यावेळी मात्र कोश्यारी यांना संधी मिळाली. पक्षाने त्यांना मुख्यमंत्री बनवलं पण नंतर लगेचच काँग्रेसने निवडणुका जिंकल्या आणि 2002 मध्ये सरकार स्थापन केलं. यानंतर भाजपच्या हायकमांडने कोश्यारी यांना राज्याबाहेरच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते राज्यसभेत गेले. नंतर 2014 मध्ये त्यांनी नैनितालमधून लोकसभा निवडणूकही जिंकली. आता भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाराष्ट्राचं राज्यपालपद आहे. सरकारस्थापनेमध्ये त्यांची भूमिका निर्णायक आहे.

===============================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 11, 2019, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading