मुंबई, 15 नोव्हेंबर: वाढत्या वयाप्रमाणे राऊतांनी परिपक्व व्हावं ही अपेक्षा आहे असं म्हणत आशिष शेलारांनी राऊतांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा दिल्या. शाहांची मुलाखत ही जनतेला सत्य समजावं यासाठी होती. शाह आणि मोदी यांना समजण्यासाठी राऊतांना बरेच जन्म घ्यावं लागतील अशी टीकाही त्यांनी राऊतांवर केली. मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारी व्यक्ती कोण हे राज्यातील जनता जाणते असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.