भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू

भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 08:06 AM IST

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना, 2 जणांचा मृत्यू

भिवंडी,24 ऑगस्ट : भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच पाच जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. जखमींमध्ये एनडीआरएफच्या तीन जवानांचा समावेश आहे. रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी तातडीनं दाखल झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारीत 8 वर्ष जुनी आणि बेकायदेशीर होती. परंतु ही धोकादायक अवस्थेत असल्यानं संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. तरीही काही लोक परवानगीशिवाय इमारतीत वास्तव्यास होते. या दुर्घटनेत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, एकाचा मृत्यू झाला आहे.

(वाचा : 'यंदा लेकाला आशीर्वाद द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद)

(वाचा : उदयराजेंनी पुन्हा एकदा केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप प्रवेशावर मात्र सस्पेन्स कायम)

(वाचा : राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!)

दरम्यान, 16 जुलै रोजी मुंबईतील डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता.

VIDEO: भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; दुर्घटनेची भीषण दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 07:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...