किल्ले भाड्याने देण्यात येणार का आणि कोणते? पर्यटन मंत्र्यांनी दिलं उत्तर

किल्ले भाड्याने देण्यात येणार का आणि कोणते? पर्यटन मंत्र्यांनी दिलं उत्तर

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारनं किल्ल्यांच्या विकासाचं हे धोरण उशिरा स्वीकारल्याचं पर्यटन मंत्र्यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : महाराष्ट्रातील गडकिल्ले हेरिटेज हॉटेल आणि पर्यटन विकास यासाठी भाड्याने देण्यात येणार याची बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून याचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही असं सांगितलं आहे.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचे किल्ले पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्यात येणार आहे याची माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं की,राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग एक मध्ये येतात आणि इतर सुमारे 300 किल्ले हे वर्ग दोन मध्ये येतात.

वर्ग एकचे किल्ले

वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

वर्ग दोनचे किल्ले

Loading...

वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे.

पोस्टमध्ये पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही असं स्पष्ट केलं आहे. रावल म्हणाले की, राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेल करण्यात येणार ही अफवा आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही. किल्ल्यावर लग्न किंवा इतर कार्यक्रम असं काही होणार नाही.

महाराष्ट्रात तीन प्रकारचे किल्ले

पहिल्या प्रकारात शिवाजी महाराजांचे किल्ले येतात. तर दुसऱ्या प्रकारात पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले आहेत. याशिवाय तिसऱ्या प्रकारात दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये अनेक दुर्गम भागातील गावांमध्ये असलेले किल्ले आहेत असं रावल म्हणाले.

पाहा VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

किल्ल्यामध्ये तिसऱ्या प्रकारातील किल्ल्यांवर रखवालदार नसतो. हे किल्ले राज्याच्या महसून आणि पर्यटन विभागाच्या अखत्यारित असून त्याच्या विकासासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत. या किल्ल्यांची पडझड झाली असून त्यांचा विकास करून लाइट आणि साऊण्ड शो, संग्रहालय आणि इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. किल्ले भाड्याने देण्यात येणार नसून ते दत्तक देऊन विकास करण्याच्या अटीवर काही वर्षांसाठी दिले जाणार असल्याचं रावल यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील मोठ्या किल्ल्यांना नाही तर लहान किल्ल्यांना विकसित केलं जाईल. आजही अनेक असे किल्ले आहेत ज्याकडे दुर्लक्ष होत आहे. मध्ये प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पॉण्डिचेरी, गोवा या राज्यांत किल्ल्यांचे असेच धोरण आहे. महाराष्ट्रानं सर्वात शेवटी हे धोऱण स्वीकारलं असल्याचं रावल म्हणाले.

पाहा VIDEO : किल्ल्यांच्या निर्णयावर संभाजीराजे नाराज, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

रावल यांनी कोणत्या किल्ल्यांचा या प्रकारात समावेश होतो हेसुद्धा सांगितलं आहे. ते म्हणाले की, सिंधुदूर्गमधील निवती, अहमदनगरमधील मांजससोमा, नागपूरचा नगरधन. मराठवाड्यातील नळदूर्ग या किल्ल्यांकडे दूर्लक्ष झालं आहे. या किल्ल्यांना वाचवण्यासाठीच धोरण तयार करण्यात आलं आहे.

...म्हणून ते किल्ले भाड्याने देणार, पर्यटन मंत्र्यांनी केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...