'मी अनेक पूर पाहिले पण अशी परिस्थिती कधी पाहिली नाही'

'मी अनेक पूर पाहिले पण अशी परिस्थिती कधी पाहिली नाही'

पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात 100 टक्के कर्ज माफी करावी अशी मागणी शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली.

  • Share this:

पुणे, 08 ऑगस्ट: कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात 100 टक्के कर्ज माफी करावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. तसेच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी प्रचार यात्रा थाबवून युद्धपातळीवर जनतेच्या मदतीला धाव घ्यावी, असेही पवारांनी म्हटले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी 1 महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा पवारांनी केली.

काय म्हणाले पवार...

> अलमट्टी वरून महाराष्ट्र, कर्नाटक दुरावा वाढतोय कर्नाटक सरकारने मानवता दाखवावी, वाद न करता एकत्र यावं राज्य सरकार कमी पडत असलं तरी केंद्राने मदत करावी

> शासन तोकडे का पडले, याच्या खोलात जावं लागेल

> राष्ट्रवादी चे सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार 1 महिन्याचे वेतन देणार या मदतीतील पहिला 50 लाखाचा धनादेश सोमवारी देणार.

> संगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, उणी दुणी न काढता सर्वांनी मदतीसाठी उतरावे

> शासकीय यंत्रणा कमी पडली, जवळपास नाही असं चित्र दिसतंय

> राज्य सरकारने पाणी ओसरले की पंचनामे सुरू करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी या पूरग्रस्त भागात 100 टक्के कर्जमाफी राज्य, केंद्र सरकारने द्यावी.

> बहुतेक ठिकाणी ऊसाच्या उंचीपेक्षा जास्त पाण्याची पातळी असल्याने नुकसान जास्त डाळिंब, द्राक्ष, 20 प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात त्याचं नुकसान शेतीचे नुकसान जमिनीवरची माती वाहून गेली म्हणून नुकसान जास्त. पशुधन वाहून गेलंय सांगली,कोल्हापूर हा दुधाचा पट्टा पिकं, फळ, शेतजमीन, दूध, रस्ते, घरे असं चहू बाजूनी नुकसान पूर मी अनेक पाहिले यावेळची व्याप्ती जास्त अभूतपूर्व नुकसान झालंय.

> शरद पवार नेत्यांच्या भेटींमुळे यंत्रणांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा येथे आज इच्छा असून गेलो नाही.

> शिव स्वराज्य यात्रा आम्ही थांबवत आहोत, आमची यात्रा दुष्काळी भागापुरती होती, मात्र आता ती आजपासून थांबवत आहोत.

> महापूर स्थिती पाहुन राष्ट्रवादी चा मोठा निर्णयशिव स्वराज्य यात्रा थांबवली

> राज्यकर्ते गंभीर असतील तर शासकीय यंत्रणा हलते, पवार यांचा सुभाष देशमुख यांना टोला

बोटीमध्ये बसणाऱ्यांना कोण थांबवणार, मुख्यमंत्र्यांची बोट दुर्घटनेवर प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या