महापूरातल्या मृत्यूची संख्या 40 वर, आर्थिक नुकसानीचा तर हिशेबच नाही

महापूरातल्या मृत्यूची संख्या 40 वर, आर्थिक नुकसानीचा तर हिशेबच नाही

या नैसर्गिक संकटामुळे हजारो संसार उदध्वस्त झालेत. लाख मोलाचं पशूधन गेलं. शेतीचं किती नुकसान झालं याचा तर असून हिशेबच लागला नाही. कारण अजून पाणीच ओसरलेलं नाही. हे पाणी गेल्यानंतर जेव्हा त्याचा आढावा घेतला जाईल तेव्हा तो आकडा बघून हादरा बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

  • Share this:

मुंबई 11 ऑगस्ट : महापूराने गेले काही दिवस राज्यात थैमान घातलंय. आठवडाभर धुमाकूळ घालणाऱ्या या महापूराने आत्तापर्यंत 40 जणांचा बळी घेतलाय. कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली आणि पुण्यात याचा या महापूराचा सर्वाधिक फटका बसलाय अशी माहिती पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली. या नैसर्गिक संकटामुळे हजारो संसार उदध्वस्त झालेत. लाख मोलाचं पशूधन गेलं. शेतीचं किती नुकसान झालं याचा तर असून हिशेबच लागला नाही. कारण अजून पाणीच ओसरलेलं नाही. हे पाणी गेल्यानंतर जेव्हा त्याचा आढावा घेतला जाईल तेव्हा तो आकडा बघून हादरा बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. तब्बल आठ दिवसानंतर आता पाणी ओसरायला सुरुवात झाली असून आता रोगराईचं नवं संकट उभं राहण्याची भीती व्यक्त केलीय जातेय.

VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत

ताम्रपर्णी नदीचा चंदगड तालुक्यात महापूरआलाय. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. चंदगड मधील शेकडो गावं पुराने बाधित. ग्रामीण भाग असल्यानं मदत कार्य अजूनही पोचलेलं नाहीये. अनेक गावांमध्ये रस्त्यांवर 4 ते 5 फूट पाणी आहे.

जनावरांना नेलं तिसऱ्या मजल्यावर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका सर्वाधिक पूरग्रस्त आहे. याच तालुक्यातील हसूर गाव कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर आहे. महापुरामुळे संगमातील पाणी हसूर गावात शिरून गावाला बेटाचं स्वरूप आलंय. गावातील नागरिक उंच जागेवर सुरक्षित आहेत. मात्र या उंच जागेवर जाताना ते आपल्या जनावरांनाही घेऊन गेलेत. तीन मजली घरांच्या गच्चीवर सर्व गावकऱ्यांनी जनावारांना मोठ्या मुश्किलीने नेलंय आणि जीव वाचवला.

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

गॅस आणि पेट्रोलची टंचाई

महापूरातलं बचावकार्य आता संपत आलंय तर अनेक गोष्टींचा तुडवडा निर्माण झालाय. स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झालीय. या भागात जाणारे मार्गच बंद झाल्याने ट्रकच जावू शकत नाही त्यामुळे जो साठा शिल्लक होता त्यावर दिवस काढणं सुरू आहे. पुरवढा सुरळीत व्हायला आणखी काही दिवस लागतील असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या