सांगली, 25 जुलै: सांगली (Sangli) मध्ये पुराचं पाणी उतरायला लागल्यानंतर आता पुराची दाहकता समोर यायला लागली आहे. शहरी भागातलं नुकसान फार पटकन दिसून येतं, मात्र ग्रामीण भागांमध्ये अनेक शेतकरी या पुराच्या पाण्याने उध्वस्त झाले आहेत. त्यापैकीच हे एक शेतकरी शहाबुद्दीन मुल्ला. कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry farms) करणाऱ्या शहाबुद्दीन यांचे पूर्ण वाढ झालेले तब्बल 16 हजार पक्षी कालच्या पुरामध्ये बुडून दगावले (16 thousands hens die) आहेत.
सुरुवातीला पाणी कमी असताना त्यांनी जवळपास एक हजार पक्षी उंचवट्यावर नेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी जेव्हा त्यांच्याच गळाला यायला लागलं तेव्हा त्यांनी फार्म सोडून सुरक्षित जागी जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर परत आल्यावर त्यांना जे चित्र दिसलं त्याने त्याच्या डोळ्यात होती ती केवळ भविष्याबद्दलची हताश आशा....
Konkan Flood: साहेब, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेनं फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथे पोल्ट्रीमध्ये पाणी शिरले होते. यावेळी पोल्ट्रीमधील तब्बल 16 हजारांहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे पोल्ट्रीचे व्यावसायिकाचे 20 तर 25 लाखांचे नुकसान झाले आहे. या पुरात शेती बरोबर जनावरे आणि कोंबड्यानाही फटका बसला आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
सांगलीला पुराचा धोका कायम
कृष्णेच्या पातळी गेली 54 फुटाच्या वर गेली आहे. तर सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. तर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या पुरात 30 ते 30 हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत. काल पावसाने उघडीप दिली होती मात्र सकाळ पासून रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangli