मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत वाढवला LOCKDOWN, जाणून घ्या कसा असेल चौथा टप्पा

मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत वाढवला LOCKDOWN, जाणून घ्या कसा असेल चौथा टप्पा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला  आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. याआधी सलग तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 30 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज (17 मे) संपत आहे. उद्यापासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे.  या टप्प्यात राज्य सरकारने अधिक अटी शिथिल करण्याची तयारी केली आहे. रेड झोन क्षेत्रांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जर शासकीय कार्यालय येत असतील तर ते बंद राहतील, अशा स्वरूपाचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी काढले आहेत.

हेही वाचा... -तब्बल दीड महिन्यानंतर सुखद बातमी! मालेगावात 617 पैकी 428 कोरोनारुग्ण झाले बर

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात महत्त्वाचे बदल..

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोविड-19 रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथिल न करण्याचा विचार राज्य सरकारने घेतला आहे.

शहरातील काही भागांमध्ये जिथे रुग्ण आढळले नाहीत अशा भागांमध्ये सूट देण्याचा जवळपास निर्णय राज्य सरकार घेतला आहे. 18 मे पासून ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन क्षेत्रात आरटीओ सब रजिस्टार शासकीय कार्यालय जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  दुसरीकडे,  मोठ्या प्रमाणात लोक शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. अशा काळात ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अधिक कडक अंमलबजावणी करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हेही वाचा -धक्कादायक! औरंगाबाद जेलमध्ये लघुशंकेला उठलेल्या तरुण कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जी लोकं स्थलांतरित होणार आहेत, त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये जिथे ग्रीन आणि ऑरेंज झोन आहेत या क्षेत्रात रुग्ण संख्या वाढू नये यासाठी देखील नवे काही कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत.

दरम्यान,  लॉकडाऊन वाढता वाढता वाढे, अशीच सध्या देशात परिस्थिती आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रासह देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपणार आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकार घोषणा करणार आहे. याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

First published: May 17, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या