निलेश राणे कमबॅक करणार की पराभूत होणार? EXIT POLL मधून समोर आला अंदाज

निलेश राणे कमबॅक करणार की पराभूत होणार? EXIT POLL मधून समोर आला अंदाज

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला होता.

  • Share this:

मुंबई, 20 मे : महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चुरशीची लढाई झाली आहे. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे तर शिवसेनकडून विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात होते. 'न्यूज18'च्या एक्झिट पोलनुसार निलेश राणे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. याठिकाणी शिवसेनेचे विनायक राऊत विजयी होतील, असं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

भाजप - 21 ते 23

शिवसेना - 20 ते 22

काँग्रेस - 0 ते 1

राष्ट्रवादी - 3 ते 5

एकूण :

महायुती - 42 ते 45

महाआघाडी - 4 ते 6

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

शिवसेना युतीत येताच राणे भाजपपासून दूर

मधल्या काळात शिवसेना सतत सत्तेविरोधात भूमिका घेत होती. अशातच भाजपनं कोकणात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंना जवळ केलं. पण नंतर मात्र लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती झाली. त्यामुळे भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडलं.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

मागच्या दोन निवडणुकांत काय झालं?

2009 मध्ये रत्नागिरी - सिंधुदुर्ग या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी निलेश राणे हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये विनायक राऊत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. यावेळी निलेश राणे दुसऱ्या क्रमांकावर होते.

विनायक राऊत - आधी आमदार, मग खासदार

शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि आताचे इथले उमेदवार विनायक राऊत मुंबईत पार्ले विधानसभा मतदारंघातून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेतही काम केलं. मागच्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार झाले.

या लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ,सावंतवाडी, कणकवली हे सहा मतदारसंघ आहेत.

महिला मतदार जास्त

या लोकसभा मतदारसंघात 13 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यातही महिला मतदार 7 लाखांहून जास्त आहेत.

VIDEO : अशोक चव्हाणांची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, वर्तवला नांदेडचा अंदाज

First published: May 20, 2019, 9:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading