LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र; महाराष्ट्रात युती ऐतिहासिक बहुमताकडे

LIVE EXIT POLL : केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र;  महाराष्ट्रात युती ऐतिहासिक बहुमताकडे

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदात EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 12 जागांचाही सर्व्हे घेण्यात आला. मतदानोत्तर चाचणीत आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, अजित पवार, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, अशा महत्त्वाच्या जागांचा अंदाजही खाली सविस्तर देत आहोत.

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर  - 02

अपक्ष - 03

मागील विधानसभेत काय होती स्थिती?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

EXIT POLL: वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंना मिळणार का जनतेचा कौल?

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

2014 महाराष्ट्र विधानसभेची स्थिती

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

EXIT POLL : पश्चिम महाराष्ट्रात युती 'आघाडी'वर, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

Exit Poll 2019: उत्तर महाराष्ट्रात यंदाही फुलणार 'कमळ' तर आघाडीचा सुपडा साफ

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

EXIT POLL 2019 : मराठवाड्यातही भाजप-शिवसेना 'पैलवान', आघाडीला दाखवले आस्मान?

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

EXIT POLL - विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 21, 2019, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading