'कॉलेजमध्ये माझा झाला अपमान', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनं केली विष पिऊन आत्महत्या

'कॉलेजमध्ये माझा झाला अपमान', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनं केली विष पिऊन आत्महत्या

कोल्हापूरमधील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या बी.टेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या धर्मराज दत्तात्रय इंगळे (वय 21 वर्ष) यानं विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

  • Share this:

पंढरपूर, 26 ऑगस्ट: कोल्हापूरमधील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या बी.टेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या धर्मराज दत्तात्रय इंगळे (वय 21 वर्ष) यानं विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. धर्मराज इंगळे हा मूळचा अकोल्यातील मंगळवेढा येथील रहिवासी होता. कॉलेजमध्ये अपमान झाल्याचं सांगत त्यानं विष पिऊन आत्महत्या केली. धर्मराज हा गेल्या चार वर्षांपासून कोल्हापुरातील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. परंतु शुक्रवारी ( 23 ऑगस्ट) धर्मराजच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांनी फोन करून सांगितलं की,'तुमच्या मुलाचा कॉलेजमध्ये अपमान झाला आहे. त्यामुळे तो आत्महत्या करणार असल्याचं म्हणतोय. त्यामुळे त्याला एसटी बसमध्ये बसवून गावाकडे पाठवून दिले आहे'.

(वाचा :इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या भामट्यास अटक)

तसंच संध्याकाळी 6 वाजता घरी आल्यानंतरही त्यानं कुटुंबीयांनाही आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. यामुळे सर्व जण त्याच्यावर नजर ठेवून होते. पण अखेर त्यानं कुटुंबीयांची नजर चुकवून आयुष्य संपवलं. शनिवारी (25 ऑगस्ट) पहाटे बागेत फवारण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक त्यानं पिऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धर्मराजला तातडीनं सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये आणलं. पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

(वाचा : आय एम गोईंग टू सुसाईड.. पुण्यात अॅडमिशन न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या)

धर्मराज कॉलेजमधील हुशार विद्यार्थी होता. परंतु गावाकडे येण्यापूर्वी दोन दिवस तो कोणत्यातरी मानसिक तणावाखाली होता. माझा कॉलेजमध्ये अपमान झाला असून मी आत्महत्या करणार असे तो वारंवार मित्रांना तसंच आईवडिलांना सांगत होता.  आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं सर्वांची माफीदेखील मागितली होती.  या घटनेमुळ धर्मराजच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे.  त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधून काढण्याची मागणी धर्मराजच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

महिलेची छेड काढल्यानं रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2019, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading