निकालांचं वार फिरलं, या बड्या नेत्यांची मुलं पहिल्यांदाच विजयी!

निकालांचं वार फिरलं, या बड्या नेत्यांची मुलं पहिल्यांदाच विजयी!

फक्त आदित्यच नाही तर अनेक बड्या नेत्यांचीही मुलं पहिल्यांदाच विजयी झाली आहेत. पाहुयात कोण आहेत हे नेते आणि त्यांची मुलं.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : आज विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस अनेकांचं भविष्य ठरवणार आहे. मजमोजणी आता अंतिम टप्प्यात आली असून निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.  पहिला ठाकरे दणदणीत मतांनी विजयी झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला पहिला सदस्य विधानसभेत पोहोचला आहे. फक्त आदित्यच नाही तर अनेक बड्या नेत्यांचीही मुलं पहिल्यांदाच विजयी झाली आहेत. पाहुयात कोण आहेत हे नेते आणि त्यांची मुलं.

हीच ती वेळ म्हणत आदित्य ठाकरे यांची विधानसभेत जाण्याची वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीह निवडणूक लढवली नाही. मात्र,  ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं निवडणूक लढवली आणि जिंकलीही. शिवसेनेसाठी मुंबईतला सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी शड्डू ठोकला.

इतर बातम्या - होमग्राऊंडवरचा पराभव शिवसेनेला झोंबला, तृप्ती सावंत यांना पोलीस सुरक्षा!

युवासेनेच्या माध्यमातून मागील नऊ वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचे नेते, युवासेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी जोरदार मेहनत घेतली. त्या सर्वांची मेहनत फळाला आली आणि आदित्य ठाकरेंचा विजय झाला.

पवार कुटुंबातले रोहित पवार यांनी जलसंधारणमंत्री राम शिंदेंचा पराभव केला. रोहित पवार यांनी मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात मोर्चेबांधणी केली. साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला. युवकांमध्ये लोकप्रिय झालेल्या रोहित पवार यांनी अखेर बाजी मारली.

लातूर ग्रामीण मतदारासंघाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मुलगा आणि आमदार अमित देशमुख यांचा भाऊ धीरज देशमुख या मतदारसंघात मैदानात होते. अमित आणि धीरज या दोन्ही भावांनी त्यांच्या मतदारसंघात विजय मिळवला. धीरज देशमुखांना पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवण्यात यश आलं.

इतर बातम्या - मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

दापोली मतदारसंघातून योगेश कदम विजयी झाले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा  मुलगा योगेशनं राष्ट्रवादीच्या संजय कदम यांचा पराभव केला. योगेशनं पहिल्यांदाच विजय मिळवताना राष्ट्रवादीच्या ताब्यातला मतदारसंघ खेचून आणला.

श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरेंनी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेंनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता वडील लोकसभेत आणि मुलगी विधानसभेत असं चित्र पाहायला मिळतंय.

इतर बातम्या  - Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान या विजयामुळे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलाय.

विधानसभेत मोठ्या संख्येनं तरूण चेहरे पोहोचल्यानं विधानसभेच्या कामकाजात तरूणांची छाप पाहायला मिळेल. तसंच यंग जनरेशनमुळे नव्या आयडियाही पाहायला मिळणार हे नक्की.

इतर बातम्या - निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या