Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

एवढ्या मतांनी माझा पराभव होईल अशी अपेक्षा मला नव्हती अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 06:48 PM IST

Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

परळी, 24 ऑक्टोबर : परळी, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांचा सगळ्या मोठा हायव्होलटेज निकाल समोर आला आहे. सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा निवडणूकांमधून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत तर भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, ऐवढ्या मतांनी माझा पराभव होईल अशी अपेक्षा मला नव्हती अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

- मतदानाचा कल मला मान्य

- विकासाची काम अपेक्षित नव्हतं

- प्रतिसाद होता त्यामुळे अपेक्षित नव्हतं

Loading...

- जनतेचा कौल मला मान्य आहे

- राजकारणाचा वेगळा चेहरा बघायला मिळाला

- ज्यांना मताधिक्य मिळालं त्यांनाही अनाकलनीय

- पराभवाची सर्व जबाबदारी माजी

- मला लोकांनी नाही स्वीकारलं असं मी समजून चालेन

- मला पुन्हा एकदा संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती

सुरुवातीला हाती लागलेल्या निकालानुसार पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, बाजी मारत आता धनंजय मुंडे विक्रमी आघाडीवर आहेत. त्यामुळे परळीतून धनंजय मुंडे यांचा विजय झाले. हळूहळू निकालाचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून तब्बस 11व्या फेरीमध्ये धनंजय मुंडे हे 18 हजार 200 मतांनी पुढे होते. महाराष्ट्राच्या विधानसभा निकलांमध्ये हा सगळ्यात धक्कादायक निकाल असल्याचं समजलं जात आहे. दरम्यान, परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघाचा Exit Poll

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असा Exit Poll चा निकाल सांगण्यात आला होता. या पोलनुसार, पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते. पण अशात धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

परळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास

परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.2009 मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. यावेळी पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि आमदार झाल्या.

इतर बातम्या - काँग्रेसला मोठा धक्का, भाजपमधून राधाकृष्ण विखेंनी राखला शिर्डीचा गड

या निवडणुकीत पंकजा मुंडेंना आमदारकीचं तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे विधान परिषदेत आमदार झाले. परळी मतदारसंघ पूर्वी रेणापूर म्हणून ओळखला जायचा. या मतदारसंघात एखादा अपवाद वगळला तर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पूर्वीच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे 5 वेळा आमदार झाले. 1985 ला मात्र पंडितराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडेंचा पराभव केला. 2009 मध्ये पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघाची रचना झाली. त्यानंतर 2 वेळा इथून पंकजा मुंडे आमदार झाल्या.

परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. 2016 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या गटाने बाजी मारली. पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी नगरपालिकेत सत्ता आणू शकल्या नाहीत याची त्यावेळी खूपच चर्चा झाली. यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.

इतर बातम्या - निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पाहायला मिळाला. मात्र भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात 19 हजारांचं मताधिक्य मिळालं.

पंकजा मुंडे या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री असल्याने परळीमध्ये त्यांचा दबदबा आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांसाठी त्यांनी भरीव निधी आणला.

2014 विधानसभा निवडणुकीतली मतं

पंकजा मुंडे, भाजप - 96 हजार 904

धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस - 71 हजार 009

प्रा. टी. पी. मुंडे, काँग्रेस - 14 हजार 946

इतर बातम्या - विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...