Baramati Election Result 2019 Live Updates: अजित पवारांनी उडवला भाजपचा धुव्वा, विक्रमी मतांची आघाडी

maharashtra Election Result 2019 LIVE: सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी आघाडीवर आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 11:13 AM IST

Baramati Election Result 2019 Live Updates: अजित पवारांनी उडवला भाजपचा धुव्वा, विक्रमी मतांची आघाडी

बारामती, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते. यात सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी आघाडीवर आहे. अजित पवार 82026, तर गोपीचंद पडळकर 10971 मतांवर आहेत. बारामतीत  अखेरची 11 वी फेरी चालू असून या अजित पवार 71055 मतांनी आघाडीवर आहेत.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

बारामती मतदारसंघाचा EXIT POLL

बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. गोपीचंद पडळकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बारामतीत भाजपने वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी दिल्याने चुरस वाढली होती. तर अजित पवारांनी राज्यभर प्रचार करत बारामतीचा गढ सांभाळला होता. अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय प्रचारात गुंतले होते. तर शरद पवार यांनीही सभा करत मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबद्दल काही वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता.

Loading...

बारामतीत भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 08:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...