• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

गळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. 27 व्या फेरीअखेर बारामतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार 1,63,176 मतांनी आघाडी घेत विजयाचा झेंडा रोवला आहे

 • Share this:
  बारामती, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. 27 व्या फेरीअखेर बारामतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार 1,63,176  मतांनी आघाडी घेत विजयाचा झेंडा रोवला आहे. तब्बल दिड लाखांचा आकडा अजित पवार यांनी पार केला आहे. सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुळगावी काटेवाडीत पहिल्यांदा जाऊन मतदान केलं होतं. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना देताना बारामतीकरांचे आभार मानले होते. बारामतीकरांनी आमच्यावर कायम विश्वास दाखवला. याही वेळी ते विश्वास दाखवतील असं अजित पवारांनी सांगितलं होतं. लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येकानी मतदान करावं. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गोष्टी होत असतात. मात्र सगळी कटुता आता संपली पाहिजे. आघाडीला उत्तमं यश मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या आशेला बारामतीकरांनी साथ दिलं असंच म्हणावं लागेल. यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली होती. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा होती. इतर बातम्या  - Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया बारामती मतदारसंघाचा EXIT POLL बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. गोपीचंद पडळकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. इतर बातम्या - इतर बातम्या - या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतय दिग्गज उमेदवारांना टक्कर! बारामतीत भाजपने वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी दिल्याने चुरस वाढली होती. तर अजित पवारांनी राज्यभर प्रचार करत बारामतीचा गढ सांभाळला होता. अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय प्रचारात गुंतले होते. तर शरद पवार यांनीही सभा करत मतदारांना भावनिक आवाहन केलं होतं. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबद्दल काही वक्तव्य केल्याने मोठा वाद झाला होता. इतर बातम्या - निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी बारामतीत भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न' भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती. इतर बातम्या - विधानसभेचे पहिले 12 निकाल एका क्लिकवर, राणे, पवार आणखी कोण झालं विजयी? यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.
  First published: