Maharashtra Election Result : 11 वाजताचे 11 मोठे अपडेट्स

Maharashtra Election Result : 11 वाजताचे 11 मोठे अपडेट्स

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. भाजप- सेना युतीसाठी ही निवडणूक वाटत होती, तेवढी एकतर्फी ठरलेली नाही. 11 धक्कादायक कल.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे आता स्पष्ट होतंय. भाजप- सेना युतीसाठी ही निवडणूक वाटत होती, तेवढी एकतर्फी ठरलेली नाही. भाजपला अनेक अपेक्षित जागांवर पिछाडी अनुभवायला मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मतदारसंघातला निकाल LIVE पाहण्यासाठी आमच्या इथे क्लिक करा. सर्व 288  उमेदवारांचा एकत्रित निकाल इथे  पाहता येईल.

11 वाजेपर्यंतचे राज्यातले मुख्य 11 अपडेट्स

१. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 30000 नी पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर

२. परळीमध्ये सातव्या फेरीअखेरही धनंजय मुंडेच आघाडीवर, पंकजा पिछाडीवर

३. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना मोठी आघाडी

४. मावळ : बाळा भेगडे पिछाडीवर; राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना मोठी आघाडी

५.  वरळी : आदित्य ठाकरेंना मोठी आघाडी; पहिल्या फेरीअखेर अभिजीत बिचुकलेंनी भोपळाही नाही फोडला.

६. सोलापूर मध्य : प्रणिती शिंदे पिछाडीवर; MIM चे हाजी फारुख आघाडीवर

६. सातारा विधानसभेत शिवेंद्रराजे आघाडीवर

७. बारामतीत अजित पवार यांना 50 हजारांची आघाडी

८. भोकर : अशोक चव्हाण यांना मोठी आघाडी

९. शिवसेनेचे विजय शिवतारे 8000 मतांनी पिछाडीवर

१०. पुणे कँटोन्मेंट काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर

११. पालघर : श्रीनिवास वनगा आघाडीवर

Maharashtra Election Live Result : फडणवीस मंत्रिमंडळातले सात मंत्री पिछाडीवर

LIVE  निकालात काय आणि कसं पाहा?

महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढती आणि उमेदवारांचा LIVE अपडेट

प्रमुख उमेदवारांच्या थेट लढती इथे करा क्लिक

महाराष्ट्राचा नकाशा - कुणाला कोणती जागा इथे पाहा Map

मतदारसंघानुसार निकाल - इथे करा क्लिक

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो.

या वेळी भाजप- शिवसेना-आरपीय महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ लढा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 101 जागा लढवत काही मतदारसंघात चुरशीची स्पर्धा निर्माण केली. वंचित बहुजन आघाडीमधून आणि MIM यांची फारकत झाल्याने एकत्रित परिणाम कमी झाला. तरी वंचित फॅक्टर मराठवाड्यात कमाल करतो का याची उत्सुकता आहे. प्रचारादरम्यान भाजप, शिवसेनेला खरी लढत दिली शरद पवार यांनी. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे सभांना गर्दी खेचली तरी त्याचा परिणाम मतपेटीवर किती झाला हे कळेलच.

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

Maharashtra Election Result 2019 Live : सांगलीत कोणाची होणार सरशी?

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच कमळ फुलणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 10:52 AM IST

ताज्या बातम्या