Maharashtra Election Result 2019 : कल्याणमध्ये धावलं मनसेचं इंजिन, 'ही' आहेत विजयाची समीकरणं

Maharashtra Election Result 2019 : कल्याणमध्ये धावलं मनसेचं इंजिन, 'ही' आहेत विजयाची समीकरणं

कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन धावलं आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा विजय झाला आहे.

  • Share this:

कल्याण, 24 ऑक्टोबर : मनसेच्या इंजिनला एक डबा जोडला गेला आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा विजय झाला आहे. मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीवरून पक्षात रस्सीखेच सुरू असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसेला साथ दिली, यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वादाचाही फायदा मनसेच्या उमेदवाराला झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेनं विद्यमान आमदार सुभाष भोईरांचा पत्ता केला कट

शिवसेनेनं विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. पण ऐनवेळेस केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आल्यानं खळबळ उडाली. भोईर यांच्याविरोधात ग्रामीण भागात मोठी नाराजी असल्याचं समोर आलं होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करताचा 63 गावांतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडाचा इशारा दिला होता. पण यानंतर रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामुळे भोईर समर्थकांनी म्हात्रेंविरोधात उघड उघड विरोधात प्रचार केला. याचाच फायदा मनसेच्या राजू पाटील यांना झाल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा : युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय, अभिजित बिचुकलेंना मिळाली एवढीच मतं)

विरोधक तगडा हवा - राज ठाकरे

आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा 'विरोधी पक्ष' व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसेला विरोधी पक्ष करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. पण त्यांच्या आवाहनाला जनतेनं दाद दिलेली नाही.

(वाचा : विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय)

दरम्यान, राज ठाकरेंनी अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरेंच्या प्रचार सभांनी वातावरण निर्मिती केली. मात्र याचा फारसा फायदा मनसेला झालेला दिसला नाही. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. दुसरीकडे लोकसभा निवडणूक मनसेनं लढवलीच नव्हती. यावेळेस राज ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठींबा जाहीर केला होता.

ईव्हीएमविरोधात राज ठाकरेंचं आंदोलन

EVMवरून राज ठाकरे यांनी देशव्यापी आंदोलन छेडलं होतं. निवडणुकांवर बहिष्कार घाला असं आवाहनही केलं होतं. मात्र असा बहिष्कार घालणं परवडणार नाही असं शरद पवारांनी राज यांना सांगितलं होतं. राज यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना आग्रह केल्याने शेवटच्या दिवसांमध्ये मनसेने विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला.

(वाचा :  साताऱ्याच्या निकालावर उदयनराजे झाले भावुक!)

अजितदादांच्या जल्लोषात पत्नी सुनेत्रा पवार सहभागी,कुटुंबावर टीकाकारांना सुनावले

First published: October 24, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading