EXIT POLL महाराष्ट्र भाजपबद्दल अमित शहांचा 'हा' दावा ठरणार खरा

EXIT POLL महाराष्ट्र भाजपबद्दल अमित शहांचा 'हा' दावा ठरणार खरा

अमित शहा यांनी News18 ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत महाराष्ट्रातल्या भाजप- सेना युतीबद्दल मोठा दावा केला होता. EXIT POLL चा अंदाज आल्यानंतर आता हा दावा खरा होण्याची शक्यता दिसते.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्रात भाजप -शिवसेना युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. पण भाजपला स्वबळावरसुद्धा बहुमत मिळेल, असा दावा अमित शहा यांनी News18 ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत केला होता. हा दावा खरा ठरण्याची शक्यता EXIT POLL च्या अंदाजावरून दिसत आहे. मतदानोत्तर चाचणीत भाजपला 141 जागा मिळतील असा अंदाज आहे. लढवलेल्या 157 जागांपैकी एवढ्या जागा भाजपला मिळत असतील, तर स्वबळावर सत्तेचा अमित शहांचा दावा खरा ठरल्याचं म्हणावं लागेल. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज News18 EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे.

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर - 02

अपक्ष - 03

वाचा - ठाकरे, पवार, मुंडे, चव्हाण, महाराष्ट्राच्या VIP जागेंचा काय आहे Exit Poll?

महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विशेष मुलाखत News18 चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी घेतली होती.  या भाजप पक्षाध्यक्षांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचेही संकेत दिले.

वाचा - EXIT POLL 2019 : निकालाआधीच आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीचा गांधी कुटुंबावर निशाणा

महाराष्ट्रात सेनेबरोबर युती असली तरी मुख्यमंत्रिपद आमचंच असेल, असंही शहा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र त्यांनी राज्याच्या नेत्यांवर सोपवला. देवेंद्र फडणवीस यांची टीम उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांवर एवढी मोठी जबाबदारी टाकताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण याचेही संकेत दिले. आमचं ठरलंय, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नेमकं काय ठरलं होतं, हे आता स्पष्ट होत आहे.

वाचा - 6 EXIT POLL; 6 अंदाज : कुठल्या पोलने दिल्यात काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा?

News18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीतले प्रमुख मुद्दे :

- पश्चिम बंगालमध्ये पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकतं.

- भाजपच्या यशाचं प्रमाण पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक ठिकाणी भाजपने आपला रस्ता निश्चित केला आहे.

- जम्मू काश्मीरमध्ये प्रशासनाच्या मदतीने पुढच्या 15 वर्षांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे.

- मॉब लिंचिंग पूर्वीसुद्धा होत होतं. आपल्याला तो एक सामाजिक प्रश्न म्हणून सोडवायचा आहे की, त्याचं राजकारण करायचं आहे?

- हिंदी दिवस - हिंदीच्या आग्रहाबद्दल माझ्या भाषणाचा गैरअर्थ काढण्यात आला. मी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर असं म्हणालो होतो. आमचं धोरण स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याचंच आहे.

- राम मंदिर - रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल, त्याचा आदर केला जाईल.

----------------------------------------

अमित शहा यांची EXCLUSIVE Uncut मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 09:17 PM IST

ताज्या बातम्या