SPECIAL REPORT : मोदींचा सिक्सर अन् पवारांची गुगली, राज्यात बदलणार का राजकीय समीकरण?

SPECIAL REPORT : मोदींचा सिक्सर अन् पवारांची गुगली, राज्यात बदलणार का राजकीय समीकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा पक्ष सत्तेत असो किंवा नसो मात्र पवार साहेब नेहमीच चर्चेत असतात.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवारांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी गुगली टाकली. सत्तास्थापनेबद्दल शिवसेना-भाजपनं बघावं असं वक्तव्य करून, पवारांनी चांगलाच धुरळा उडवून दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रवादीचं कौतुक करून सिक्सर लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा पक्ष सत्तेत असो किंवा नसो मात्र पवार साहेब नेहमीच चर्चेत असतात. विरोधी पक्षात असले तरी राज्यात कोणतं सरकार येणार याचं भविष्य शरद पवारांच्या हाती असल्याचं पाहायला मिळतंय.

हे भविष्य पवारांच्या हाती असल्यानं राज्यातले नागरिक प्रचंड आशावादी आहेत. त्यामुळे माध्यमांकडून शरद पवारांना सत्तास्थापनेविषयी प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नाचं उत्तर देताना पवारांनी चांगलीच गुगली टाकली.

दिल्लीत दाखल झाल्यानंतर शरद पवार यांना माध्यमांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा. आम्ही आमचं राजकारण करू," असं वक्तव्य केल्यानं सर्वांच्या भुव्या उंचावल्या. तर तीनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी राज्यात स्थापन होणारं सरकार पाच वर्ष सत्तेत राहणार असल्याचा दावा केला होता.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाव्य महाशिवआघाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली. राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक करून जणू नव्या समीकरणांची पायाभरणी केली.

राज्यात सत्तास्थापन्याची मॅच जिंकण्यासाठी जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे नवं सरकार स्थापनेआधीच क्लिनबोल्ड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी राज्यसभेत सिक्सर लगाऊन मॅच रोमांचक वळणावर आणून ठेवली आहे.

First published: November 18, 2019, 9:16 PM IST

ताज्या बातम्या