सेना-भाजप सरकार येण्यासाठी हिंदुत्वादी संघटना आल्या पुढे, संभाजी भिडे मांडणार भूमिका!

सेना-भाजप सरकार येण्यासाठी हिंदुत्वादी संघटना आल्या पुढे, संभाजी भिडे मांडणार भूमिका!

राज्यात भाजप आणि शिवसेना युतीने सरकार स्थापन करावं, या मागणीसाठी बुधवारी पुण्यात संभाजी भिडे पत्रकार परिषद घेणार आहे.

  • Share this:

पुणे, 19 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोर बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं यासाठी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेना युतीने सरकार स्थापन करावं, या मागणीसाठी बुधवारी पुण्यात संभाजी भिडे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी भिडे भूमिका मांडणार आहे. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने मिलिंद एकबोटे यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. युती सरकार स्थापन व्हावं, यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आहे.

विशेष म्हणजे, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला होता. त्यावेळी संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर पोहोचले होते. परंतु, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर नसल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर संभाजी भिडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानीही पोहोचले होते.

दरम्यान, कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये महाशिवआघाडीसाठी चर्चा सुरू झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये जोर बैठका सुरू आहे. दिल्लीतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक झाली. त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे.

एकीकडे, महाशिवआघाडीचा अजूनही निर्णय न झाल्यामुळे हिंदूत्वावादी संघटनाच्या गोटात भाजप-सेनेचं सरकार यावं, यासाठी हालचाल वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता संभाजी भिडे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

======================

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading