मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये आतापासूनच संघर्ष? हमारी मुख्यमंत्री कैसी हो.. घोषणा घुमल्या

अगदी अमित शहा यांचं भाषण सुरू असतानाही पंकजा समर्थक घोषणाबाजी करत होते. 'पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही' असं चंद्रकांत पाटील यांनीही दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातले स्पर्धक किती?

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 09:21 PM IST

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये आतापासूनच संघर्ष? हमारी मुख्यमंत्री कैसी हो.. घोषणा घुमल्या

मुंबई, 9 ऑक्टोबर : भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीडपासून केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघात त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे सर्वोच्च नेते बीडमध्ये अवतरले. त्यानिमित्ताने पंकजा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सभेच्या ठिकाणी पंकजा यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. अगदी अमित शहा यांचं भाषण सुरू असतानाही पंकजा समर्थक घोषणाबाजी करत होते. हमारी मुख्यमंत्री कैसी हो... पंकजा मुंडे जैसी हो! अशा घोषणा सुरू झाल्या आणि भाजपमधली मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच सुरू झाल्याचं जाणवलं.

पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवणारे महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधले नंबर दोनचे मंत्री ठरलेले चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्री होणार का या प्रश्नाला बगल देत पक्षश्रेष्ठी ठरवतील असं म्हणाले होते. पुण्यात प्रचार मेळाव्यानंतर बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की, 'पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही.' त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षश्रेष्ठी ठरवतील तो मुख्यमंत्री असं सांगताना, दादा पाटील आपल्याला महत्त्वाकांक्षा नाही, असंही म्हणाले होते, तरीही दादांचं नाव चर्चेत असल्याचं कार्यकर्ते सांगतात.

वाचा - नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांचा महायुतीला कमी भाजपलाच जास्त फायदा

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षं सरकारवर पूर्ण पकड मिळवत स्थान पक्कं केलं आहे, असं वाटत असतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी त्यांचं नाव निश्चित नसल्याच्या बातम्या सुरू झाल्या. मीच पुढचा मुख्यमंत्री असं फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधीच सांगून टाकलं होतं. नंतरही युतीची बोलणी सुरू असताना त्यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री असं ठासून सांगितलं होतं.

वाचा - महायुतीत फूट, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

Loading...

देवेंद्र फडणवीस पाच वर्षांपूर्वी या खुर्चीवर स्थानापन्न झाले, त्या वेळी त्यांची निवड तशी अनपेक्षित ठरली होती. तत्कालीन भाजपचे राज्यातले सर्वांत मोठे नेते गोपिनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि चित्र पालटलं. इतर सर्व इच्छुकांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस राज्याच्या प्रमुखपदी नेमले गेले.

वाचा - ओवैसी म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पिक्चर 'दी एंड', मोदी-पवारांची सेटिंग

फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा आणि विरोध पक्षनेते म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी याच्या जोरावर त्यांना हे पद दिलं गेलं. पण त्याच वेळी भाजपचे त्या वेळचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पदासाठी आग्रही होते. त्यांनी तशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यांना डावलून मुख्यमंत्रिपद मिळवताना फडणवीसांनी अनेक 'इच्छुकां'वर कुरघोडी केली.

वाचा - ओबीसी नेत्यांचं अंडरस्टँडिंग.. लोकसभेच्या मदतीची पंकजा मुंडे अशी करणार परतफेड

पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्रिपदी आपणच योग्य उमेदवार असल्याचा दावा केला होता. त्या वेळी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत  विदर्भातले नितीन गडकरी यांचे खास सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हेसुद्धा होते. आता या स्पर्धेतले खडसे आणि तावडे यांचं तर तिकीटही कापलं गेलं आहे.

लोकांचा कल मतपेटीत बंद होण्याआधीच सत्ताधारी भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा असल्याचं दिसू लागलं आहे.

VIDEO : समोर पैलवानच दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

--------------------------------------------------

बालेकिल्ल्यात पार्थबद्दल अजित पवारांची घेतला निर्णय, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...