Home /News /maharashtra /

'शिंदे सरकार'चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार!

'शिंदे सरकार'चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार!

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीआधीच होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळे एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारी नवे मंत्री शपथ घेतील. पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. आमदारांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असलं तरीही अजून त्यांना खातं मिळालेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिंदे सरकारमध्ये भाजप गृह, अर्थ आणि महसूल या तीन प्रमुख खात्यांसाठी आग्रह धरू शकते, असंही बोललं जात आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या