'त्यांना शेतकरी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही', राजू शेट्टींचा सदाभाऊंवर हल्लाबोल

'त्यांना शेतकरी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही', राजू शेट्टींचा सदाभाऊंवर हल्लाबोल

सदाभाऊ खोत हे औरंगाबादच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी खोत यांनी शासकीय निवासस्थानी न राहता पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं पसंत केलं.

  • Share this:

कोल्हापूर, 15 मे : 'मंत्र्यांचे दौरे म्हणजे दुष्काळी पर्यटन सुरू आहे. ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. आता त्यांना शेतकरी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही,' असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत हे औरंगाबादच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी खोत यांनी शासकीय निवासस्थानी न राहता पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं पसंत केलं. त्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. अशातच आता राजू शेट्टींनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंत्री पंचतारांकित संस्कृती मधून बाहेर पडायला तयार नाहीत, असा टोला राजू शेट्टींनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सदाभाऊ खोत हे आज औरंगाबाद दुष्काळाची पाहणी करत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पाण्यावाचून तर जनावरांचे चारा-पाण्यामुळे हाल सुरू आहेत. सदाभाऊ मात्र शहरातील पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्कामी आहेत. सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते आहेत. आज मात्र दुष्काळातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेताना ते पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं पसंत करत आहेत.

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

First published: May 15, 2019, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading