राज्यात 'महाराष्ट्र दिना'चा सर्वत्र उत्साह, वेगवेगळ्या ठिकाणी जंगी कार्यक्रमांचं आयोजन

राज्यात 'महाराष्ट्र दिना'चा सर्वत्र उत्साह, वेगवेगळ्या ठिकाणी जंगी कार्यक्रमांचं आयोजन

राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

1 मे: प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश... म्हणून गौरवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा आज 57वा वर्धापन दिन. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे  1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. यानिमित्ताने राज्यभरात तसचं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात येईल. त्याचबरोबर, आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जंगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

1960साला पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. त्यानंतर मात्र कालांतराने स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली. यात अनेकांनी मुंबईसह महाराष्ट्रची मागणी केली. तर मोरारजी देसाई यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली. देसाईंच्या या मागणीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी मोठा संघर्षही झाला. या संघर्षात सर्वात मोठा वाटा हा गिरणी कामगारांचा होता. या संघर्षानंतर 1 मे, 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.

दरम्यान, महाराष्ट्र दिना बरोबरचं आज कामगार दिन सुध्दा साजरा केला जातो. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला, मात्र त्यासोबतच त्यांची पिळवणूकही सुरू झाली. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यात 12 ते 14 तास राबवून घेतलं जात होतं. याविरोधात कामगार एकत्र आले आणि कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला फक्त 8 तास काम असावं, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आलं. आणि तेव्हा पासून 1 मे 1981 पासून कामगार दिन पाळण्यात येतो.

महाराष्ट्र दिनानिमित्त डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मी महाराष्ट्रचा , महाराष्ट्र माझा हे राज ठाकरे याचं घोषवाक्य सार्थ करण्याचा प्रयत्न इथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केला.

First published: May 1, 2017, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading