दीपक बोरसे (प्रतिनिधी)औरंगाबाद, 19 ऑगस्ट: धुळे-औरंगाबाद शहादा एसटी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 13 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 प्रवासी गंभीर जखमी आहेत. रविवारी रात्री प्रवाशांनी भरलेल्या बसची कंटेनरला धडक बसली आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.