गडचिरोली हल्ल्याबाबत पोलीस महासंचालकांचा धक्कादायक खुलासा!

गडचिरोली हल्ल्याबाबत पोलीस महासंचालकांचा धक्कादायक खुलासा!

जांभूरपाडा येथे राज्य पोलीस दलाच्या C-60 पथकावर झालेल्या हल्ल्यात आमच्याकडून काही चुका झाल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मान्य केले.

  • Share this:

गडचिरोली, 02 मे: जांभूरपाडा येथे राज्य पोलीस दलाच्या C-60 पथकावर झालेल्या हल्ल्यात आमच्याकडून काही चुका झाल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मान्य केले. बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात C-60 पथकातील 15 जवान शहीद झाले होते. जयस्वाल यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'महाराष्ट्र दिनी' गडचिरोलीच्या जांभूरपाडा येथे राज्य पोलिस दलाच्या C-60 पथकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 15 जवानांसह खासगी गाडीचा चालक देखील ठार झाला होता. या चालकाला राज्य सरकारकडून मदत दिली जाईल असे, जयस्वाल यांनी सांगितले. तो चालक देखील शहीदच असल्याचे माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे जयस्वाल म्हणाले.

नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला दुर्दैवी होता. पण यामुळे आमचे मनोबल खच्चीकरण होणार नाही. यापुढेही आम्ही मोहीमा सुरुच ठेवणार असल्याचे जयस्वाल यांनी ठामपणे सांगितले. मी गडचिरोलीत 1992-95 या काळात पोलिस अधिक्षक होतो. तेव्हा आणि आताच्या परिस्थितीत फार फरक असल्याचे ते म्हणाले. नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही 15 जवान गमावले आहेत. तपासात नेमक्या काय चुका झाल्या याचे विश्लेषण केले जाईल. गडचिरोलीत पोलिसांचे नेटवर्क कमी पडले, असे वाटत नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

VIDEO : नवरदेवाने घेतला उखाणा, पण उदयनराजेंच्या अ‍ॅक्शनने नवरीच लाजली...

First published: May 2, 2019, 6:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading