• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • CBI नं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले समन्स

CBI नं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले समन्स

एक मोठी बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे.

  • Share this:
    मुंबई, 01 ऑक्टोबर: एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (State Chief Secretary Sitaram Kunte) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांना सीबीआयनं समन्स (summoned by the CBI) बजावले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहेत. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचालनालयही मनी लाँडरिंगची चौकशी करत आहे. या प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयनं अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीचाच एक भाग म्हणून सीबीआय सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार आहे. हेही वाचा- देशाचा विकास! आज पंतप्रधान मोदी करणार 'या' दोन मोठ्या मोहिमेचं लॉन्चिंग समोर आलेल्या माहितीनुसार, संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. तसंच दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली आहे की, जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात यावं. नेमकं प्रकरण काय? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. देशमुखांनी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं, असा आरोपही पत्रात करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत आहे. हेही वाचा- Bigg Boss Marathi 3 : अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये जोराचा वाद , VIDEO आला समोर याच तपासाचा भाग म्हणून साक्ष नोंदवण्यासाठी सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published: