#MatKarForward: द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे महाराष्ट्र सायबर पोलिसांचे आवाहन, पाहा VIDEO
#MatKarForward: द्वेष पसरवणारे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे महाराष्ट्र सायबर पोलिसांचे आवाहन, पाहा VIDEO
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. त्याकरता त्यांनी काही सेलिब्रिटींबरोबर बनवलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे
मुंबई, 07 मे : सध्या देशामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे. अशावेळी कोरोना संबधित किंवा इतर काही फेक बातम्या किंवा समाजामध्ये तिरस्कार निर्माण करणाऱ्या बातम्या जास्त वेगाने पसरत आहेत. अफवांना बळी पडल्याने अनेक ठिकाणी मारहाण, बाचाबाची किंवा भीती निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. अशावेळी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी काही सेलिब्रिटींबरोबर या व्हिडीओ बनवला आहे. क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता आयुष्मान खुराना, अभिनेत्री कृती सॅनन आणि सारा अली खान यांनी यांच्या साथीने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हा व्हिडीओ बनवला आहे.
(हे वाचा-हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, सलाईनमध्ये सापडलं शेवाळ)
हा व्हिडीओ शेअर करताना #matkarforwardहा हॅशटॅग वापरून असे व्हिडीओ, मेसेज आणि कोणताही चुकीचा मजकूर फॉरवर्ड न करण्याचा संदेश महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिला आहे. द्वेष आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडीओपासून सावधान राहण्याचा इशारा या व्हिडीओतून देण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे 'हा देखील समाजातील एक व्हायरस आहे'. असे व्हिडीओ, मेसेजेस फॉरवर्ड तर नाहीच झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर बनायला देखील नाही पाहिजेत असा संदेश देण्यात आला आहे. जर तुम्हाला असा कोणता मेसेज दिसला ज्यामुळे कोणाचही नुकसान होणार असेल, तर त्या व्हिडीओला फॉरवर्ड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(हे वाचा-नेत्यांच्या बैठकीत काय घडलं?फडणवीसांनी दिली ग्वाही तर उद्धव ठाकरे म्हणाले...
या व्हिडीओच्या शेवटी महाराष्ट्र सायबर पोलीसचे उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी 'शोले' चित्रपटातील एका दृश्याचा हवाला देत अफवा कशा पसरतात याचे उदाहरण दिले आहे.
समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज किंवा व्हिडीओ एखाद्याचा जीवावर बेतू शकतात. त्यामुळे असे कोणतेही मेसेज फॉरवर्ड होऊ नयेत याकरता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
दरम्यान क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता आयुष्मान खुराना, अभिनेत्री कृती सॅनन आणि सारा अली खान या चौघांनी #matkarforward याच मोहिमेअंतर्गत आणखी एक व्हिडीओ बनवला आहे. तो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.