मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सावधान! चुकूनही पाहू नका या वेबसीरिज आणि ऑनलाइन फिल्म्स; सरकारचा अलर्ट

सावधान! चुकूनही पाहू नका या वेबसीरिज आणि ऑनलाइन फिल्म्स; सरकारचा अलर्ट

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे.

अभिषेक पांडे/मुंबई, 29 जून : सध्या लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेक जण घरात आहेत. अशात विरंगुळा म्हणून ऑनलाइन फिल्म्स (online films), वेबसीरिज (web series) पाहण्याकडे कल वाढलेला आहे. तुम्हीदेखील अशा बऱ्याच वेबसीरिज पाहत असाल, ऑनलाइन चित्रपटांचा पुरेपूर आनंद लुटत असाल. मात्र सावध राहा. अशा वेबसीरिज आणि फिल्म्स पाहणं तुम्हाला चांगलंच महागात पडेल. कोरोना लॉकडाऊनच्या या परिस्थितीचा हॅकर्स आपला चांगलाच फायदा करून घेत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागाने (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे. काही ऑनलाइन फिल्म्स आणि वेबसीरिज पाहणं चांगलंच महागात पडू शकतं, असं सरकारने सांगितलं आहे. ऑनलाइन फिल्म्स पाहण्याच्या नादात तुमचा प्रायव्हेट डेटा चोरीला जाऊ शकतो. हॅकर्स यावर टपून बसले आहेत. अशी सूचना जारी करण्यात आली आहे. असे दहा चित्रपट आणि दहा वेबसीरिजची यादी सरकारने जारी केली आहे.

हे वाचा - Corona Effect : बिग स्टार्सचे हे 7 चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

यामध्ये दिल्ली क्राइम, ब्रुकलीन नाइन-नाइन अशा वेब सीरिज तर मर्दानी 20, छपाक, जवानी जानेमन, बाहुबली अशा चित्रपटांचा समावेश आहे.

या यादीतील कोणतीही वेबसीरिज तुम्ही पाहत असाल, चित्रपट ऑनलाइन पाहत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध राहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हॅकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करतील, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Cyber crime, Hackers, Web series