कर्फ्यूमध्येही मोकाट फिरणाऱ्यांचा होणार बंदोबस्त, महिला अधिकारी रस्त्यावर

कर्फ्यूमध्येही मोकाट फिरणाऱ्यांचा होणार बंदोबस्त, महिला अधिकारी रस्त्यावर

सरकारने आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 24 मार्च : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केली आहे. मात्र नगरकरांनी कायदा मोडत भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. सरकार आपल्या परीने सर्व प्रयत्न करत आहे. नागरिक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असं चित्र नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले.

अहमदनगरमध्ये काही जण कुठलेही काम नसताना फिरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी पारनेरच्या तहसीलदार ज्योती पवार स्वतः रस्त्यावर उतरल्या आहेत. ज्योती पवार यांनी कायदा मोडणाऱ्या नागरिकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन पॅकेट पद्धतीने वितरित करण्याची राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी केली आहे. राज्यात अचानक उद्भवलेल्या जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेची रोजगार नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी जाऊ शकत नसल्याने उपासमार होत आहे.

हेही वाचा- जग 2008-09 पेक्षाही भयावह मंदीच्या खायीत लोटलं जाणार, IMFच्या संचालकांचा इशारा

'अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन सुविधेला योग्य पद्धतीने हायजीन स्वरूपात पॅकेट तयार करून ते जनतेपर्यंत व्हॅनद्वारे पोहोचून वितरित केल्यास उपास मार टळेल. तसेच राज्यातील गोरगरीब जनतेचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल,' अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी पत्राद्वारे  उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

First published: March 24, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading