महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20000 पार; दिवसभरात 48 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20000 पार; दिवसभरात 48 मृत्यू

आतापर्यंत राज्यात 3800 कोरोनाबाधित रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात येणार आहे, तर आतापर्यंत 779 जणांचा बळी गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : राज्यात कोरोगानाग्रस्तांचा आकडा 20,000पार गेला आहे. आतापर्यंत 3800 कोरोनाबाधित रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात येणार आहे, तर आतापर्यंत 779 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात राज्यात 48 मृत्यूंची नोंद झाली. यात सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले आहेत.

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 20228 झाली आहे. आज 1165 नवीन रुग्णांचं निदान झाले आहे. राज्यात आज  330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत राज्यात 2,27,804 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यातले 20,228 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यभरात 2,41,290 लोक होम क्वारंटाइमध्ये असून 13,976 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 48 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मालेगाव शहरात आज 8 मृत्यू नोंदले गेले असले तरी ते 25 एप्रिल ते 8 मे  या कालावधीत झालेले आहेत. उर्वरित मृतांच्या संख्येत मुंबईमधील 27, पुण्यातील 9,  पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरात 1, नांदेड शहरात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पोलीस दलात कोरोनामुळे 6वा मृत्यू, नाशिकमध्ये तैनात कॉन्स्टेबलने सोडला जीव

शरद पवार मोहिते पाटलांना हिसका दाखवणार? सोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट

कारभार हाती घेताच BMCच्या आयुक्तांनी दाखवली हिंम्मत, केलं हे काम

First published: May 9, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या