'त्या' वाढलेल्या मृत्यूंमुळे महाराष्ट्राचा मृत्यूदर पोहोचला 5 च्या जवळ; आज दाखल झाले इतके नवे रुग्ण

'त्या' वाढलेल्या मृत्यूंमुळे महाराष्ट्राचा मृत्यूदर पोहोचला 5 च्या जवळ; आज दाखल झाले इतके नवे रुग्ण

कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम 1409 ने वाढला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर अनेक दिवसानंतर 4 च्या पुढे गेला आहे. देशात सध्या फक्त गुजरातचा मृत्यूदर पाचच्या पुढे आहे.

  • Share this:

मुंबई 9 जून:  राज्यात Coronavirus मुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा दडवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आज आरोग्य विभागातर्फे आकड्यांची फेरपडताळणी करण्यात आली आणि तब्बल 1328 मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या 81 कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम 1409 ने वाढला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर अनेक दिवसानंतर 4 च्या पुढे गेला आहे. देशात सध्या फक्त गुजरातचा मृत्यूदर पाचच्या पुढे आहे.

कालपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा मृत्यूदर 3.70 होता तो आज अचानक 4.8 वर गेला आहे.  आज राज्यात 81 मृत्यू नोंदले गेले. फेरपडताळणीत कोविड मृत्यूंची संख्या 1328 ने वाढल्याचं दिसतं. 862 प्रकरणं मुंबई महानगर क्षेत्रातली आणि अन्य जिल्ह्यातले 466 प्रकरणं कोव्हिड मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले आहेत.

बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली असली तरी नव्या रुग्णांच्यात वाढ होण्याचं प्रमाण कायम आहे. आजही राज्यात तब्बल 2702 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 1,13,445 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा भराभर वाढतो आहे. राज्यात आतापर्यंत 5537 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला  आहे.

मुंबईतील 950 कोरोना मृत्यू का दडवले? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 50.99  टक्के

मृत्यूदर -  3.70 टक्के

सध्या राज्यात 5,86,686लोक होम क्वारंटाइन आहेत. 27,242 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत.

अन्य बातम्या

कोरोनाच्या संकटात यांना विसरलात; मात्र हा तरुण दररोज 700 कुत्र्यांचं भरतोय पोट

'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप

First published: June 16, 2020, 9:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या