Home /News /maharashtra /

एकाच दिवशी राज्यात झाला 24 महिलांचा मृत्यू; राज्यात कोरोनारुग्णांचा आकडा 24,427

एकाच दिवशी राज्यात झाला 24 महिलांचा मृत्यू; राज्यात कोरोनारुग्णांचा आकडा 24,427

कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

राज्यात दिवसभरात एकूण 53 कोरोनारुग्णांचे मृत्यू नोंदले गेले. त्यातल्या 24 महिला आहेत.

    मुंबई, 12 मे : आज महाराष्ट्रात 1026 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 24,427 झाली. राज्यात दिवसभरात एकूण 53 कोरोनारुग्णांचे मृत्यू नोंदले गेले. त्यातल्या 24 महिला आहेत. पुरुषांपेक्षा महिलांच्या मृत्यूचं प्रमाण कमी राहिलं होतं. पण एका दिवसात 24 महिलांचा मृत्यू हा आकडा चिंता वाढवणारा आहे. त्यातली दिलासादायक बाब अशी की आज  339 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात  5125 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 21 हजार 645  नमुन्यांपैकी 1 लाख 95 हजार 804 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 24हजार 427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 81 हजार 655 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 53 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची राज्यातली एकूण संख्या आता 921 झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 28, पुण्यात 6, पनवेल मध्ये 6, जळगावमध्ये 5, सोलापूर शहरात 3,  ठाण्यात 2,  रायगडमध्ये 1, औरंगाबाद शहरात 1 आणि अकोला शहरात 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 53 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21  रुग्ण आहेत तर 27  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 53 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये ( 66  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या