मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन असूनही मुंबईत 24 तासांत 748 रुग्ण वाढले; राज्याचा आकडा 19000 वर

लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन असूनही मुंबईत 24 तासांत 748 रुग्ण वाढले; राज्याचा आकडा 19000 वर

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

प्रतिबंधित क्षेत्रातले (Containment Zone) निर्बंध कडक करून, लॉकडाऊन वाढवूनही महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतोच आहे. आज राज्सात 1089 नवीन रूग्णांची नोंद झाली, तर 37 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई, 8 मे : प्रतिबंधित क्षेत्रातले (Containment Zone) निर्बंध कडक करून, लॉकडाऊन वाढवूनही महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढतोच आहे. आज राज्सात 1089 नवीन रूग्णांची नोंद झाली, तर 37 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 19000 च्या वर जात 19063 वर पोहोचला आहे.  मुंबईतच आज 748 नवे रुग्ण आढळले. आता मुंबई शहरातला आकडा 12142 वर पोहोचला आहे.

राज्यात आज 37 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 25 मृत्यू मुंबईत झाले आहेत. पुण्यात 10 जणांचे मृत्यू गेल्या 24 तासांत नोंदले गेले आहेत.  याशिवाय जळगाव जिल्ह्यात एक आणि अमरावती शहरात एक मृत्यू झाला आहे. राज्यातून आजपर्यंत 3470 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे. 2 लाख 39 हजार 531 जण आज होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13,494 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ११३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ५५२ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५२.६४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

मुंबईतल्या कोरोना प्रसाराचा वेग आटोक्यात आलेला नाही. शहरातली परिस्थिती लक्षात घेत महापालिकेच्या प्रशासनातही मोठे बदल आज करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांनी तातडीने कार्यभार स्वीकारला आहे.

' लॉकडाऊनचं काय करायचं...' उद्धव ठाकरेंच्या संवादामधले 10 महत्त्वाचे मुद्दे

मुंबईतल्या कोविड परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. "मुंबईत लष्कर आणणार, अशा अफवा काही जण पसरवत आहेत. ते अजिबात होणार नाही", असं उद्धव म्हणाले.

पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणार मोठी वाढ; 9000 क्वारंटाइन बेड्सची तयारी

"मुंबईत लष्कर येणार ही अफवा. तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही", अशी ग्वाही त्यांनी दिली. "केंद्र सरकारला विनंती आहे की, पोलिसांना विश्रांती देण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. केंद्र सरकारकडे त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ मागावं लागेल. याचा अर्थ लष्कराला पाचारण केलं असा नाही.  म्हणून आधी तुम्हाला सांगतो आहे", असं ठाकरे म्हणाले.

मुलीच्या वर्दीवरचे स्टार पाहतायत वडील, बापलेकीचा PHOTO होतोय व्हायरल

First published:
top videos

    Tags: Coronavirus