मुंबई, पुणे नागपूरनंतर यवतमाळमध्येही 'कोरोना', राज्यातील रुग्णांची संख्या 22 वर

मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगरपाठोपाठ आता यवतमाळमध्येही (yavatmal) कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra) आता कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) एकूण 22 रुग्ण आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगरपाठोपाठ आता यवतमाळमध्येही (yavatmal) कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra) आता कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) एकूण 22 रुग्ण आहेत.

  • Share this:
    मुंबई, 14 मार्च : राज्यातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगरपाठोपाठ आता यवतमाळमध्येही (yavatmal) कोरोनाव्हायरस पोहोचला आहे. यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. यवतमाळमध्ये कोरोनाव्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत. हे दोघंही दुबईला गेलेत. या रुग्णांनंतर आता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी 4, ठाणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. शिवाय कोरोनाव्हायरस पसरू नये, यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सगळ्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
    First published: