महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार; जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण

Maharashtra Coronavirus updates: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घसरण होत आहे.

Maharashtra Coronavirus updates: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घसरण होत आहे.

  • Share this:
    मुंबई, 12 जून: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी दिलासादायक बातमी म्हणजे राज्यातील एक जिल्हा संपूर्णपणे कोरोनामुक्त (Zero covid cases in district) होण्याच्या वाटेवर आहे. या जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण (Only 43 active cases in district) आहेत. त्यामुळे हा जिल्हा लवकरच कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त होईल. महाराष्ट्रात आज रोजी एकूण 1,55,474 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वात कमी सक्रिय रुग्ण हे बुलडाणा जिल्ह्यात आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बुलडाणा जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे बुलडाणा जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल हे स्पष्ट आहे. बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 82032 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी 81350 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्य स्थितित जिल्ह्यात अवघे 43 सक्रिय रुग्ण आहेत. लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच परभणी मनपात आज एकही रुग्ण नाही राज्यात आज एकूण 10697 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज एकही रुग्णाची नोंद झालेली नाहीये. परभणीकरांसाठी एक मोठी दिलासादायक आणि चांगली बातमी आहे. राज्यात आज 14,910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 53,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.48 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 360 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 239 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 121 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद? ठाणे मंडळ - 2267 नाशिक मंडळ - 978 पुणे मंडळ - 2760 कोल्हापूर मंडळ - 3503 औरंगाबाद मंडळ - 224 लातूर मंडळ - 361 अकोला मंडळ - 387 नागपूर मंडळ - 217 एकूण - 10,697
    Published by:Sunil Desale
    First published: