मुंबई, 5 मे: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत घट होत आहे आणि त्यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट (recovery rate) सुद्धा वाढत आहे. मात्र, असे असताना कोरोना बाधितांच्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. कारण, राज्यात आज कोरोना बाधित मृतकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
आज राज्यात तब्बल 920 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची (Covid patient death) नोंद झाली आहे. या 920 मृत्यूंपैकी 414 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 219 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 287 मृत्यू हे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. राज्यातील मृतकांच्या आकडेवारीत होणारी ही वाढ निश्चितच चिंतेत भर टाकत आहे. राज्यातील मृत्यू दर हा 1.49 टक्के इतका आहे.
आज राज्यात 57640 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज राज्यात 57006 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 41,64,098 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 85.32 टक्के इतके झाले आहे.
ठाकरे सरकारची 'महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन' मोहीम राज्याला देणार प्राणवायू
राज्यात आज रोजी एकूण 6,41,596 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज 57,640 रुग्णांचे निदान झाले आहे त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 48,80,542 इतकी झाली आहे. पाहूयात कुठल्या विभागात किती रुग्णांची आज नोंद झाली आहे.
ठाणे - 10,292 रुग्णांचे निदान
पुणे - 13,490 रुग्णांचे निदान
कोल्हापूर - 4072 रुग्णांचे निदान
औरंगाबाद - 2664 रुग्णांचे निदान
लातूर - 3874 रुग्णांचे निदान
अकोला - 5898 रुग्णांचे निदान
नागपूर - 8234 रुग्णांचे निदान
सर्वाधिक सक्रिय रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 114254 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 58,944 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 56153 सक्रिय रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात एकूण 44716 सक्रिय रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.