• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Delta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या, जाणून घ्या गेल्या 24 तासांतील कोरोना अपडेट्स

Delta Plus च्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पुन्हा 5 आकडी रुग्णसंख्या, जाणून घ्या गेल्या 24 तासांतील कोरोना अपडेट्स

महाराष्ट्रात पुन्हा एकदा Coronavirus ची दैनंदिन रुग्णसंख्या पाच अंकी नोंदली गेली आहे. कोरोनाच्या नव्या अवताराच्या (delta plus variant) पार्श्वभूमीवर ही बाब चिंता वाढवणारी आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जून : महाराष्ट्रात  (Maharashtra) आलेली कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) ओसरत असताना आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा घटत असताना गेल्या 24 तासांतील आकडेवारी मात्र पुन्हा चिंता वाढवणारी असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात एकूण 10,066 नवे कोरोना (New Corona Patients) रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण 163 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Deaths) झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र अद्यापही अधिकच आहे. गेल्या 24 तासांत 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यानं काढलेल्या पत्रकातून जाहीर केलं आहे. आतापर्यंत एकूण 57,53,290 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 95.93 टक्के नोंदवण्यात आला आहे. सध्या 5,92,108 रुग्ण हे आपापल्या घरात क्वारंटाईन आहेत, तर 4,223 रुग्णांची विलगीकरण कक्षात काळजी घेतली जात असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लसीकरणाला वेग महाराष्ट्रात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून या आठवड्यात एकाच दिवसात 5,51,909 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्राने नोंदवलेला हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. यापूर्वी 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 5,34,372 नागरिकांचं एका दिवसात लसीकरण झालं होतं. लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे कोरोना अधिक वेगाने नियंत्रणात येईल, असा विश्वास आरोग्य खात्यानं व्यक्त केला आहे.

  हे वाचा - Delta Plus Variant: डेल्टा प्लसने वाढवली चिंता; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती

  डेल्टा व्हायरसची भीती राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांत डेल्टा प्लस विषाणूचे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लस विषाणूचे संक्रमण होण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे म्हटलं, ॲन्टीबॉडीचा कुठलाही उपयोग शरीराला होऊच न देण्याचा गुणधर्म डेल्टा मध्ये पहायला मिळत असल्याचं टोपेंनी म्हटलंय. 15 मे पासून आरोग्य विभागाने प्रोजेक्ट हातात घेतला प्रत्येक जिल्हयात 100 सॅम्पल पाठवत आहोत. 3400 सॅम्पलमधून ही आकडेवारी समोर आली आहे. अनेक रुग्णांची कोरोनावर मात डेल्टा चे गुणधर्म चांगले नाही आहेत. आम्ही सर्वप्रथम या रूग्णांना आयसोलेट करत आहोत. ट्रॅव्हल हिस्ट्री घेत आहोत. डेल्टा बाबत अभ्यास सुरू आहे. डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी काही रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती टोपेंनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published: