Home /News /maharashtra /

पंजाबने वाढवला लॉकडाऊन; महाराष्ट्रात काय होणार? उद्धव ठाकरेंच्या घोषणेकडे लक्ष

पंजाबने वाढवला लॉकडाऊन; महाराष्ट्रात काय होणार? उद्धव ठाकरेंच्या घोषणेकडे लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करत 3 मेपर्यंत ताळेबंदी वाढवली. आता पुढे काय होणार?

  मुंबई, 29 एप्रिल : महाराष्ट्रात ठाकरे सरकारने दुसरा लॉकडाऊन लागू केला त्याला दोन आठवडे उलटून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करत 3 मेपर्यंत ताळेबंदी वाढवली. आता काही राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत टाळेबंदी वाढवण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. पंजाबने सर्वप्रथम आणखी 15 दिवस टाळेबंदी वाढणार असल्याची घोषणा केली आता Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळेबंदी वाढवण्यासंदर्भाच्या निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे लक्ष आहे. राज्यात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. आज राज्याची संख्या 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या दोन शहरांमधला आणि जिल्ह्यांमधला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन करूनही चीन, इटलीला जमलं नाही ते भारताने केलं, 30 दिवसांत काय झालं? लॉकडाऊन वाढवण्यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. 26 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला त्या वेळी त्यांनी लॉकडाऊन उघडणार नाही, पण निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. "लॉकडाऊनमुळे ही साथ आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणली. मुंबईत थोडीफार सूट दिली पण लगेच लोकांची वर्दळ वाढली. हे आपल्याला परवडणार नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 3 मेनंतर राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा लक्षात घेऊन पुढे योग्य ती पाऊलं उचलली जातील. गर्दी आणि सोशल डिस्टसिंग पाळावंच लागेल, असं त्यांनी चार दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 664 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 9361 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 38.30 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 'अम्मा मला नेण्यासाठी आली आहे', इरफान खानचे हृदय हेलावून टाकणारे शेवटचे शब्द

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या