मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Corona updates: गेल्या तीन दिवसांत जवळपास 2 लाख रुग्णांची कोरोनावर मात

Maharashtra Corona updates: गेल्या तीन दिवसांत जवळपास 2 लाख रुग्णांची कोरोनावर मात

Maharashtra: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. आजही राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. आजही राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. आजही राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई, 1 मे: राज्यात कोरोना बाधित (Maharashtra Coronavirus) रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असला तरी दैनंदिन रुग्णसंख्या ही 60 हजारांहून अधिक असल्याचं पहायला मिळत आहे. आजही राज्यात 63,282 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, असे असले तरी दिलासा देणारी बातमी म्हणजे कोरोमुक्त होणाऱ्यांची संख्याही 60 हजारांहून अधिक असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या तीन दिवसांत राज्यात 199573 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात गेल्या तीन दिवसांत जवळपास दोन लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 61326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या तीन दिवसांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही 60 हजारांहून अधिक आहे. पाहूयात गेल्या तीन दिवसांतील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी.

1 मे 2021 - 61326 रुग्ण कोरोनामुक्त

30 एप्रिल 2021 - 69710 कोरोनामुक्त

29 एप्रिल 2021 - 68537 कोरोनामुक्त

आज राज्यात 61326 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण 39,30,302 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 84.24 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 63282 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Corona Vaccine सर्व ओझं माझ्या खांद्यांवर आलं, मी एकटा काय करणार? अदार पुनावालांच्या भावनांचा स्फोट

पाहा कुठल्या राज्याती किती सक्रिय रुग्ण

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई६५२३६८५७४२०२१३२१५१६२६६३३२५
ठाणे५१५९६८४५९०६१६८९५३१४९९८१
पालघर९००४४७०६३०१२३३१०१८१७१
रायगड१२३०८०१०७८३५२१२३१३१२०
रत्नागिरी२४२२०१५५३६५२२८१६०
सिंधुदुर्ग१३१२११०४३६३४४२३४१
पुणे८५३२३०७३८६८२९६४२५७१०४८४९
सातारा१०५००६८३८२०२३०८१०१८८६८
सांगली८०९४७६४६८४२०७४१४१८७
१०कोल्हापूर६७१७२५५८७११७९८९५००
११सोलापूर१०८८९१८७४७३२६०९५९१८७५०
१२नाशिक३१८२५८२६५८८९३११३४९२५५
१३अहमदनगर१७५०९४१५१३२६२०१३२१७५४
१४जळगाव११९९२७१०५१९८१९१७२८१२७८४
१५नंदूरबार३५०६८२७५५९५७२६९३६
१६धुळे३८१४९३३७११४३५१०३९९३
१७औरंगाबाद१२५८५१११०३४११९९३१४१३५०३
१८जालना४४९९७३७५३४६५०६८१२
१९बीड५६५६०४२३३२९२३१३२९६
२०लातूर७२६१३५६७८८११४४१४६७७
२१परभणी३७३३४२४८१६५९५११११९१२
२२हिंगोली१३८७२११६७५१८६२०११
२३नांदेड८१८५९७१६५०१६२४८५७७
२४उस्मानाबाद४०३५५३०४४२९३०१८८९६५
२५अमरावती६४६८८५६५०२९१०७२७४
२६अकोला४१३२८३५८९४६२४४८०६
२७वाशिम२७५४३२३७७१३०२३४६७
२८बुलढाणा४६४५४३६०४६३७२१००३१
२९यवतमाळ५१९९४४२९१४९८१८०९५
३०नागपूर४२८४०१३४६८७३५१९१४६७६२९१
३१वर्धा४३६५५३५७६४५४७८२७२६२
३२भंडारा५१४२९३९८०५४९११११२७
३३गोंदिया३३१३३२४४९३३४१८२९३
३४चंद्रपूर६२६२६३४५३०६८५२७४०९
३५गडचिरोली२०३७३१६२१९१९५३९५०
इतर राज्ये/ देश१४६११८२६
एकूण४६६५७५४३९३०३०२६९६१५२०७९६६३७५८

आज राज्यात 802 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 438 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 178 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 186 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai