Home /News /maharashtra /

'आमचं दुपारचं जेवण बंद झालं', कोरोनामुळे ऊसतोड मजुरांच्या 28 हजार मुलांवर उपासमारीची वेळ

'आमचं दुपारचं जेवण बंद झालं', कोरोनामुळे ऊसतोड मजुरांच्या 28 हजार मुलांवर उपासमारीची वेळ

ऊसतोड मजूर अजून फडातच आहेत. त्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली.

बीड, 25 मार्च : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर मुलावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसमुळे शाळा, वसतिगृह, हंगामी वसतिगृह बंद केल्याचा सर्वात मोठा फटका ऊसतोड मजुरांच्या मुलांना बसला आहे. ऊसतोड मजूर अजून फडातच आहेत. त्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली. एकीकडे शासन कोरोनाच्या उपाय योजनेसाठी आग्रही असताना दुरीकडे या मुलावर उपासमारीची वेळ आली आहे. या बाबतीत शासनाने तत्काळ उपाय योजना कराव्यात आणि विदयार्थ्यांची उमासमर थांबवावी, अशी मागणी आता केली जात आहे. वडवणी तालुक्यातील कान्होबाचीवाडी या गावातील 80 टक्के लोक उसतोडणीला गेले आहेत. या गावात 50 मुले ही प्राथमिक शिक्षण घेतात. 15 मार्चपासून शाळा बंद केल्याने या गावातील ऊसतोड मजूर मुलांसाठीचे हंगामी वसतिगृह बंद झाल्याने या गावातील 35 मुलांच्या खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावात फक्त वयोवृद्ध माणसे आहेत. त्यांना काम होत नाही, पण शाळा बंद केल्यामुळं या मुलाना संभाळावं कसं ही अडचण 65 वर्षाच्या सुशीला बाई गाडे यांनी बोलून दाखवली. सुशीला बाई यांना चार नातवंडे आहेत. अशीच परिस्थिती गावातील विनायकराव गाडे यांची आहे. पाच नातवंडे आहेत, मुले अजून आली नाहीत. या मुलांना जेवण तयार करून खाऊ घालणं अडचणीचं ठरत आहे. वडवणी तालुक्यातील खडकी देवळा, केज तालुक्यतील जिवाचीवाडी, शिरूर तालुक्यतील लोणी वारनी बीड तालुक्यतील पिंपळनेर, उमरद खालसा,या गावातील वसतिगृह बंद करण्यात आली आहे. शाळा बंद झाल्याने घरीच राहावं लागत आहे. अजूनही आई वडील आले नाहीत. त्यामुळे दुपारचे जेवण मिळत नाही, असे एका विदयार्थ्याने सांगितलं. हेही वाचा- PM मोदींचं एक भाषण आणि जयंत पाटलांनी सांगितले 5 दुष्परिणाम, म्हणाले... बीड जिल्हयातून पाच लाख ऊसतोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसतोडणीला जातात. त्यांच्या मुलांसाठी जिल्हापरिषद शाळेत असतात. हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात आली आहेत. बीड जिल्हयात या वर्षी 550 वसतिगृहामध्ये तब्बल 28 हजार मुले होती. मात्र कोरोनाव्हायरसमुळे शासनाने 15 तारखे पासून बंद करण्यात आली आहेत. अद्याप ऊसतोड मजूर गावी आले नाहीत. या मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत पालक येणार नाहीत तोपर्यंत ही वसतिगृह सुरू ठेवावीत आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून उपासमार थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed, Coronavirus

पुढील बातम्या