Home /News /maharashtra /

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

अभ्यासाचे लेखक आणि न्युरो-संसर्गजन्य रोगांचे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चीफ डॉक्टर इगोर कोरलॅनिक म्हणाले की, "सामान्य लोकांना आणि डॉक्टरांना याची जाणीव असणं आवश्यक आहे. कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाचा ताप, कफ आणि श्वसन समस्या शरीरात न्यूरोलॉजिकल लक्षणांपूर्वी आहे.

अभ्यासाचे लेखक आणि न्युरो-संसर्गजन्य रोगांचे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चीफ डॉक्टर इगोर कोरलॅनिक म्हणाले की, "सामान्य लोकांना आणि डॉक्टरांना याची जाणीव असणं आवश्यक आहे. कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाचा ताप, कफ आणि श्वसन समस्या शरीरात न्यूरोलॉजिकल लक्षणांपूर्वी आहे.

राज्यात आज 5527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एकूण 1,14,648 अॅक्टीव केसेस आहेत.

    मुंबई, 16 जुलै : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. राज्यात आज 8641 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर तब्बल 266 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,84,281 वर गेली आहे. राज्यात आज 5527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एकूण 1,14,648 अॅक्टीव केसेस आहेत. राज्यात एकूण मृतांची संख्या 11,194 वर गेली आहे तर आतापर्यंत 1,58,140 रुग्णांनी कोरोनावर मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाची 1476 नवीन प्रकरणं नोंदली गेली आहेत आणि 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 5523 जणांचा मृत्यू झाला आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. यासह आता देशात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्ण झाले आहे. सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6 लाख 12 लाख 815 लोक निरोगी झाले आहे. एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 झाला आहे. अशी आहे राज्यांची परिस्थिती गेल्या 24 तासात 3 लाख कोरोना व्हायरस चाचणी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या