Home /News /maharashtra /

राज्यात आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

राज्यात आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे रिकव्हरी रेटही वाढत आहे.

    मुंबई, 25 मे: राज्यातील कोरोनोची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave in Maharashtra) ओसरत असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण (Covid positive patient number decrased) होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही (recovery rate) दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 36,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 52,18,768 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 24,136 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात एकूण 3,14,368 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 26,16,428 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,35,41,565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,26,155 म्हणजेच 16.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. होम आयसोलेशन बंदच्या निर्णयाला पुण्याच्या महापौरांचा विरोध, राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी राज्यात आज 601 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 389 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 212 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.61 टक्के इतका आहे. कुठल्या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण?  सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 45,648 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 27,855 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 23,702, साताऱ्यात 18,909 सक्रिय रुग्ण आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान ठाणे विभाग - 2832 नाशिक विभाग - 3850 पुणे विभाग - 5947 कोल्हापूर विभाग - 3795 औरंगाबाद विभाग - 1196 लातूर विभाग - 1526 अकोला विभाग - 3648 नागपूर विभाग - 1345 एकूण - 24,136 रुग्णांचे निदान
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra, Pune

    पुढील बातम्या