Home /News /maharashtra /

राज्यात संचारबंदी असताना शिरूरमध्ये उडणार निवडणुकीचा बार

राज्यात संचारबंदी असताना शिरूरमध्ये उडणार निवडणुकीचा बार

सदर निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी सोसायटीचे संचालक महेश नलगे यांनी केली आहे.

जुन्नर, 25 मार्च : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून राज्य सरकाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचार बंदी लागू केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथे चक्क सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची तहकूब सभा ऐन जमावबंदी काळाच लावण्यात आली असून ही निवडणूक येत्या 27 मार्च ला होणार आहे. तहकूब सभेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनानुसार सदरची सभा घेण्यात येणार असल्याची माहिती आर.बी वाळुंज यांनी पञकाद्वारे संचालकांना दिली आहे. सदर निवडीबाबतचा अजेंडा ही संचालकांना देण्यात आला आहे. राज्यात संचार बंदी असतानाही अशा पद्धतीने निवडणूक कार्यक्रम लावणाऱ्या संबधितावर तात्काळ कारवाई व्हावी व सदर निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी सोसायटीचे संचालक महेश नलगे यांनी केली आहे. देशातील बळींचा आकडा वाढला कोरोनानं जगभरात हाहाकार पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महराष्ट्रात सर्वाधिक 101 आकडा आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे. तमिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा विळखा 100 हून अधिक देशांना बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Shirur

पुढील बातम्या