मुंबई, 14 मार्च : राज्यातील (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus)रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. नागपुरात (Nagpur) कोरोनाव्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4 झाली आहे, नागपुरात धोका वाढला आहे. तर दुसरीकडे पुण्याहून (Pune) दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाव्हायरसबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
हे वाचा - नवजात बाळालाही Coronavirus, विषाणूची लागण झालेला सर्वात कमी वयाचा रुग्ण
राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी 4, ठाणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.
शिवाय कोरोनाव्हायरस पसरू नये, यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.
#Coronavirus साथरोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाने टाळावे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 13, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्ट्या जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.
हे वाचा - कोरोना प्रभावित देशातून आलेले 335 प्रवासी बेपत्ता, तपासणी न केल्याने धोका वाढला