LIVE : 8 जानेवारी रोजी कोरोना लशीसंदर्भात देशभरात अखेरची ड्राय-रन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 06, 2021, 19:43 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  12 वर्षांच्या मुलाची अल्पवयीन मित्राकडून दगडानं ठेचून हत्या, साताऱ्यातील म्हसवे गावातील घटना, अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी केली अटक

  22:2 (IST)

  सीमा भागातील मराठी महिला संपादकांना शासनाच्या अधिस्वीकृती पत्रिकेचं वितरण, सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवू या -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  22:0 (IST)

  मुंबई मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं 6 सदस्यीय समिती केली गठित, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, मुंबई मेट्रो मार्गिका 3, 4 आणि 6 या तीन मेट्रो मार्गिकांच्या एकत्रित कार डेपोसाठी करणार अभ्यास, एका महिन्यात समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार

  21:56 (IST)

  आज रात्रीपासून मुंबईत नाईट कर्फ्यू नाही
  कालपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता लागू
  मुंबई पोलिसांच्या वतीनं केलं जाहीर

  20:43 (IST)

  शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो याचं भान बाळगावं, शहरांचं नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही -बाळासाहेब थोरात

  आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालतं, भारतीय राज्यघटनेची मूलतत्वं हा किमान समानचा गाभा आहे, आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे -बाळासाहेब थोरात

  छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचं राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया -बाळासाहेब थोरात

  20:25 (IST)

  छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घटना
  पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक
  माओवाद्यांचं प्रशिक्षण शिबीर केलं उद‌्ध्वस्त
  घातपाताचा माओवाद्यांचा होता प्लॅन
  चकमकीनंतर माओवादी जंगलात पळाले
  घटनास्थळी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

  20:18 (IST)

  ऐन थंडीच्या मोसमात गुहागरमध्ये पाऊस
  आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत
  पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती

  20:13 (IST)

  मंत्रिमंडळाचा प्रीमियम कमी करण्याचा निर्णय
  विकासकांना फायदा होणार -फडणवीस
  ग्राहकांना होणार नाही -देवेंद्र फडणवीस
  'मी पाठवलेल्या पत्राबाबत समाधान नाही'
  पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन -फडणवीस

  19:54 (IST)

  MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही SEBC आरक्षण रद्द, 2019 च्या पोलीस भरतीसाठी SEBC कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरणार, 2019च्या पोलीस भरती संदर्भात शासनाचा नवा आदेश, अंदाजे 3 हजार पदांसाठी होणार होती पोलीस भरती, पण कोविडमुळे गेल्या वर्षभरात पोलीस भरतीच झालेली नाही, गेल्या सप्टेंबरमध्येच गृहमंत्र्यांनी मेगा पोलीस भरतीची केलीय घोषणा, राज्यात 12 हजार 528 पदांसाठी होणार आहे पोलीस भरती, पण मराठा संघटनांच्या विरोधामुळे अद्याप नव्या पोलीस भरतीची जाहिरातच निघालेली नाही

  19:42 (IST)

  'सामान्यांसाठी घरांच्या किमती कमी होणार का?'
  भाजपचे आमदार अॅड.आशिष शेलारांचा सवाल

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स