LIVE: दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | July 10, 2021, 00:08 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:33 (IST)

    नंदुरबारचा ऑक्सिजन पॅटर्न करणारे डॉ. राजेंद्र भारुड यांची बदली, व्ही.बी. पाटील कोकण विभागाचे नवे आयुक्त, जलाज शर्मा 
    धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी, विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी, मनीषा खत्री नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी

    20:21 (IST)

    जलसंपदा विभागाचे प्रकल्प विहित काळात पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा - मुख्यमंत्री

    20:4 (IST)

    फोन टॅपिंग प्रकरणात त्रिसदस्यीय समिती, राज्य सरकारनं काढले आदेश, नाना पटोलेंनी विधानसभेत केले होते फोन टॅपिंगचे आरोप, 2015 ते 2019 मध्ये फोन टॅप झाले का याची चौकशी, 3 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

    19:40 (IST)

    'जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या'
    हा कोणाचा जय-विजयाचा प्रश्न नाही - विजय वडेट्टीवार
    ओबीसीच्या लढ्याचा विजय आहे - वडेट्टीवार
    'मुंबई लोकलसंदर्भात मी काही बोलणार नाही'
    टास्क फोर्स यावर अहवाल देईल - विजय वडेट्टीवार
    मुंबई लोकलबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील - वडेट्टीवार

    19:20 (IST)

    'सर्व विभागांनी 14 ऑगस्टपर्यंत बदल्या कराव्यात'
    'राज्यात 14 ऑगस्टनंतर बदली करता येणार नाही'
    31 जुलैपर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करा - राज्य सरकार
    1 ते 14 ऑगस्ट केवळ विशेष बदल्या - राज्य सरकार
    'एकूण कर्मचाऱ्यांच्या 15% बदल्या करता येणार'
    बदली करताना कालावधी पूर्ण असावा - राज्य सरकार

    18:39 (IST)

    राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकलल्या; जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगित, ओबीसी आरक्षणावरून झाला होता वाद, कोरोनाच्या कारणास्तव निर्णय स्थगित

    18:23 (IST)

    कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्पाला तत्वत: मान्यता, आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावं - मुख्यमंत्री

    18:10 (IST)

    पुण्यातील कोरोनाचा आढावा घेतला - अजित पवार
    50 लाख लसीकरणाचा टप्पा पार - अजित पवार
    '2 दिवसांपासून लस नसल्यानं लसीकरण बंद'
    'लसपुरवठा होईल तसं लसीकरण करतोय'
    लोकांनी मास्क वापरण्याची गरज - अजित पवार
    '2 लस घेतल्यानंतर मास्क घालायला टाळाटाळ नको'
    'काहींचा 2 लसीनंतरही बाधा होऊन मृत्यू झालाय'
    जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं - अजित पवार
    पर्यटनस्थळी गर्दीमुळे निर्बंध कडक - अजित पवार
    जे निर्बंध आहेत ते तसेच कायम - अजित पवार
    'टोलवाटोलवीपेक्षा एकत्र येऊन प्रश्न सोडवायला हवा'
    'केंद्राचं काम केंद्रानं, राज्याचं काम राज्यानं करावं'
    फडणवीस बोलतायत त्यात तथ्य नाही - अजित पवार
    'जगभरात बंद केलेले मास्क पुन्हा वापरायला सुरू'
    'केंद्र सरकारनं इंधनावरील टॅक्स कमी करावेत'
    'एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची निवेदनं घेतली'
    'नियुक्ती न मिळाल्यामुळे MPSC विद्यार्थी भेटले'
    सोमवारी मंत्रालयात लावली बैठक - अजित पवार
    '23 गावांच्या समावेशानंतर गरजेनुसार निर्णय घेऊ'
    'राज्यानं संरक्षण मंत्रालय काढून कसं चालेल?'
    काय नियम करतात ते बघून ठरवू - अजित पवार
    'सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय'
    म्हणून सगळा सहकार चुकीचा नाही - अजित पवार
    उपमुख्यमंत्र्यांनी सहकार खात्यावर दिलं उत्तर
    'भास्करराव सीनियर, जे झालं ते रेकॉर्डवर आणलं'
    'माईक तोडला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला'
    'त्या' दिवशी जे झालं ते चुकीचं - अजित पवार
    'मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं हा पंतप्रधानपदाचा अधिकार'
    आम्ही कोण त्यात लुडबूड करणार - अजित पवार
    'भारती पवार, कपिल पाटील हे आमचेच होते'
    मोदींकडे बघून हे लोक निवडून दिलेत - अजित पवार

    17:43 (IST)

    कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी
    तब्बल 15 दिवसांनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस
    जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची संततधार
    कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला
    दुबार पेरणीचं संकट टळल्यानं बळीराजाला दिलासा
    बेळगाव, सांगली जिल्ह्यातही पावसाची हजेरी
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस

    17:23 (IST)

    राज्यातील 32 शाळांना बजावली नोटीस; मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागातील शाळांचा समावेश, फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासला बसू न देणं, काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचे प्रकार करणार्‍या शाळांना मान्यता रद्द करण्याची नोटीस

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स