LIVE: एकनाथ खडसे यांची ईडीकडून 9 तास चौकशी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 08, 2021, 20:15 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:40 (IST)

  नवी मुंबई 5, मुंबई 2, पनवेलमधील एक या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना सादर

  21:24 (IST)

  भयमुक्त वातावरणात चित्रीकरण करा; चित्रपट, मालिका निर्मात्यांना कोणीही धमकवू शकत नाही, मुंबई पोलिसांचं निर्माते आणि अभिनेत्यांना आश्वासन

  20:20 (IST)

  राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी
  भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी झाली चौकशी
  खडसेंची ईडीकडून 9 तास मॅरेथॉन चौकशी
  ईडी चौकशीला आमचं सहकार्य - खडसेंचे वकील
  ईडीकडे कागदपत्रं सुपूर्द केली - खडसेंचे वकील
  गरज असेल तेव्हा हजर राहणार - खडसेंचे वकील

  20:8 (IST)

  विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं प्रथमच होणार स्ट्रक्चरल ऑडिट, पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

  19:29 (IST)

  राज्यात शिक्षणसेवक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती, 6 हजार 100 शिक्षणसेवकांची पदं आता भरणार

  19:21 (IST)

  हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी प्रशिक्षण
  20 हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण - मुख्यमंत्री
  आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयासाठी पाऊल
  मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ

  19:18 (IST)

  मुंबईत पुरेशा लससाठ्याअभावी शासकीय, महापालिका केंद्रांवर उद्या लसीकरण बंद

  19:1 (IST)

  कोरोना संकटात देशवासीयांसाठी मोठी बातमी
  आरोग्य सुविधांसाठी 23 हजार कोटींचं पॅकेज
  केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची घोषणा

  17:8 (IST)

  शिवसेना तळागाळात आहे, त्याचं बळकटीकरण करणं याकडे कल, आघाडीच्या जिथं जिथं निवडणुका असतील त्याबद्दल मविआ सरकार ठरवेल तसं होईल - अनिल देसाई

  17:8 (IST)

  आमदार, खासदार ते शिवसैनिकापर्यंत ते मार्गदर्शन करतात, लोकांचा विश्वास आहे, संघटना बळकटीकरण करणं गरजेचं आहे, असं स्फूर्ती येणारं उद्धव ठाकरेंचं आजचं मार्गदर्शन होतं - अनिल देसाई

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स